विधानसभेची नाही, ही तर नात्यांची लढाई; जाणून घ्या कुटुंबातील लढतीमध्ये कोणी आहे आघाडीवर

दरम्यान, यंदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पक्षांसोबत अनेक नात्यांमधील लढतीही पाहायला मिळत आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य एकमेकांसमोर ठाकले होते, त्यामुळे त्यांच्या निकालाकडेही महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. चला पाहूया यंदा कुटुंबामधील लढाईत पहा कोणी मारली बाजी

Maharashtra Assembly Election Result 2019 (File Image)

Maharashhtra Assembly Election Results 2019: सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. निकालाचा कल पाहता जनतेचा कौल भाजपला असलेला दिसून येत आहे. मात्र कोणत्याही क्षणी चित्र पालटू शकते. यासोबत राज्यातील अनेक हाय व्होल्टेज लढतीदेखील निकालाचे तापमान वाढवत आहेत. दरम्यान, यंदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पक्षांसोबत अनेक नात्यांमधील लढतीही पाहायला मिळत आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य  एकमेकांसमोर ठाकले होते, त्यामुळे त्यांच्या निकालाकडेही महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. चला पाहूया यंदा कुटुंबामधील लढाईत पहा कोणी मारली बाजी

परळी – धनंजय मुंडे Vs पंकजा मुंडे

परळी येथील मतमोजणीची पूर्ण झाली असून, पंकजा मुंडे यांच्यावर मात करत टाकत, धनंजय मुंडे विजयी ठरले आहेत. पंकज मुंडे यांचे भावनिक राजकारण जनतेला आकर्षित करू शकले नाही.

बीड – संजय क्षीरसागर Vs जयदत्त क्षीरसागर

बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यामध्ये लढाई पाहायला मिळत आहेत. सध्या संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना पिछाडीवर टाकले आहे. जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीवाकडून मैदानात आहेत. सकाळी पहिल्या काही फेऱ्यांमध्ये जयदत्त क्षीरसागर आघाडीवर होते मात्र आता संजय क्षीरसागर यांनी आघाडी घेतली आहे

माण - जयकुमार गोरे Vs शेखर गोरे

साताऱ्यातील माण मतदारसंघामध्ये दोन सख्खे भाऊ एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. जयकुमार गोरे हे भाजपकडून, तर शेखर गोरे हे शिवसेनेतून निवडणुकीच्या मैदानात आहे. मात्र या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्याही कडवे आव्हान असणार आहे. सध्या जयकुमार गोरे हे आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

पुसद - इंद्रनील नाईक- निलय नाईक

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मतदारसंघात कुटुंबातील लढाई पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात इंद्रनील नाईक आणि निलय नाईक असे चुलत भाऊ एकमेकांच्या समोर उभे उभे आहेत. भाजपकडून निलय नाईक तर राष्ट्रवादीकडून इंद्रनील नाईक मैदानात उभे आहेत. सध्या या मतदारसंघात इंद्रनील नाईक हे आघाडीवर आहेत.

लातूर - संभाजी पाटील निलंगेकर Vs अशोक पाटील निलंगेकर

लातूरमध्येही काका पुतण्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. लातूर येथे भाजपने संभाजी पाटील निलंगेकर यांना उमेदवारी दिली होती. दुसरीकडे कॉंग्रेसकडून अशोक पाटील निलंगेकर हे निवडणूक लढवत आहेत. सध्याचा निकाल पाहता संभाजी पाटील निलंगेकर आघाडीवर आहेत.