Maharashtra Monsoon Session: कोरोनाच्या सावटाखाली आजपासून 2 दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरूवात

मुंबई विधिमंडळामध्ये त्याचे आयोकजन करण्यात आले आहे. दरम्यान यंदा कोरोनाच्या सावटाखाली सुरक्षितपणे कामकाज पूर्ण करण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचं आव्हान यंदा प्रशासनासमोर असेल.

Maharashtra Legislative Assembly | (Photo Credit : Youtube)

महाराष्ट्रामध्ये आजापासून कोरोना संकटाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर 2 दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. मुंबई (Mumbai)  विधिमंडळामध्ये त्याचे आयोकजन करण्यात आले आहे. दरम्यान यंदा कोरोनाच्या सावटाखाली सुरक्षितपणे कामकाज पूर्ण करण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचं आव्हान यंदा प्रशासनासमोर असेल. यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये (Maharashtra Monsoon Session) प्रश्नोत्तराचा तास नसेल मात्र महत्त्वाची विधेयकं पटलावर येणार आहेत.

कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. तर सचिवालयाला यंदा विधिमंडळात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाला त्यांचा कोरोना चाचणी आर टी पीसी आर टेस्टचा रिपोर्ट सादर करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. आमदारांसह त्यांचे सचिव, पत्रकार आणि इतर सुरक्षा कर्मचार्‍यांनादेखील कोरोना टेस्ट बंधनकारक आहे. त्यासाठी मागील दोन दिवस विधिमंडळ परिसरामध्ये खास टेस्टिंगची सोय करण्यात आली होती.

दरम्यान सध्या पावसाळी अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांमध्ये 2 आमदारांसह 40 हून अधिक अधिकारी व कर्मचारी करोनाबाधित आढळले आहेत. दोन दिवसांत सुमारे 2200 पेक्षा अधिक लोकांनी विधिमंडळ परिसरात चाचणी केली आहे.

विधिमंडळामध्ये आज येत्या काही महापौर- उपमहापौरांच्या निवडणूका तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलणे, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, 2020, (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (नवीन महाविद्यालय तसेच नवीन अभ्यास पाठ्यक्रम इत्यादी सुरू करण्यासाठी मान्यता देण्याकरिता नियत करण्यात आलेला दिनांक, सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी वाढवून देणे) ते महाराष्ट्र आकस्मिकता निधी (दुसरी सुधारणा) अध्यादेश, 2020 (आकस्मीता निधिची मर्यादा तात्पुरती वाढवणे) अशी विधेयकं पलटावर येणार आहेत.