Mahad Flood: महापूरातून सावरणाऱ्या महाड शहरासमोर साथीच्या आजारांचे आव्हान, प्रशासनाकडून आरोग्य तपासणीचे अवाहन
महापूराच्या संकटातून महाड सावरते आहे. नागरिक कसेबसे पुन्हा एकदा आपले दैनंदिन जीवन सुरु करत आहेत. तोवर आता साथिच्या आजारांनी (Epidemic Diseases) महाड शहरात डोके वर काढले आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील आणि शहरातील सर्वच नागरिकांनी आवश्यक ती आरोग्य तपासणी (Health Check-Up) करुन घ्यावी, अशी मागणी प्रशासनाने केली आहे.
महाराष्ट्रात काही जिल्ह्यांध्ये मुसळधार पाऊस पडला. त्याचा फटका अनेक गावं, वस्त्या, वाड्या आणि शहरांना बसला. रायगड जिल्ह्यातील महाड शहरालाही या पावसाचा फटका बसला. महाड शहराला पुराच्या (Mahad Flood) पाण्याचा वेढा पडला. अवघ्या शहरात पाणी खुसले. नागरिकांचे, व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले. काही जीवित आणि वित्त हाणीही मोठ्या प्रमाणावर झाली. आता या महापूराच्या संकटातून महाड सावरते आहे. नागरिक कसेबसे पुन्हा एकदा आपले दैनंदिन जीवन सुरु करत आहेत. तोवर आता साथिच्या आजारांनी (Epidemic Diseases) महाड शहरात डोके वर काढले आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील आणि शहरातील सर्वच नागरिकांनी आवश्यक ती आरोग्य तपासणी (Health Check-Up) करुन घ्यावी, अशी मागणी प्रशासनाने केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, महाड शहर आणि परसरात लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis) आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 15 जणांना लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis) आजाराची लागण झाल्याचे पुढे आले आहे. कोरोना व्हायरस संक्रमितही तीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी वेळीच आवश्यक ती तपासणी करुन घ्यावी असे अवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
महाड शहराला महापूराचा तडाखा बसून आता आठवडा संपत आला आहे. पुराचे पाणी कमी झाले आहे. नागरिक शहरात पुन्हा परतले आहेत. शहरात कचऱ्याचे ढिगच्या ढिक पाहायला मिळत आहेत. सर्वत्र चिखल आणि अनेक ठिकाणी दुर्घंती पाहायला मिळते आहे. अनेक नागरिकांच्या घरामध्ये चिखल आणि गाळ साचला आहे. नागरिकांना हा गाळ, चिखल टाकण्यासाठी पर्याय नसल्याने हा चिखल गाळ नगरिक रस्त्यांवर टाकताना आढळून येत आहे. पुराच्या पाण्यात आगोदरच रस्त्यावर आलेला चिखलगाळही तसाच आहे. भिजलेल्या, सडलेल्या, कुजलेल्या अन्न, धान्य, मृत प्राणी यामुळे शहरातील दुर्घंधीत अधिकच भर पडत आहे. त्यामुळे शहरात रोगराईचा धोका अधिक वाढला आहे. (हेही वाचा, Mahad, Raigad Landslide: महाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा निधी 2 दिवसांत वितरीत होणार; एकनाथ शिंदे यांची घोषणा)
महाडा शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणावर मदत येत आहे. मोठ्या प्रमाणावर मदत पथकेही रवाना झाली आहे. या पथकांच्या सहाय्याने महाड शहर आणि शहरवासीय पुन्हा नव्याने उभारण्याचा प्रयत्न करत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)