Maha Vikas Aghadi: उद्धव ठाकरे यांचे समाधान? शरद पवार आणि काँग्रेस खूश? महाविकासआघाडीच्या जागावाटपावर तोडगा

प्राप्त माहितीनुसार, 105 जागा लढवत काँग्रेस मविआमध्ये मोठा भागिदार तर त्या खालोखाल शिवसेना (UBT) 95 आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस 85 जागा लढवणार असे सूत्र निश्चित झाले असून सर्वांची त्यावर सहमती असल्याचे समजते.

Maha Vikas Aghadi | (Photo Credits: ANI)

महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) जागावाटप सूत्र निश्चित करुन आज (बुधवार, 23 ऑक्टोबर) ते जाहीर करणे अपेक्षीत आहे. मंगळवारी रात्री उशीरपर्यंत चाललेल्या बैठकीत झालेला काथ्याकूट अखेर फळाला आल्याचे समजते. ज्यामुळेही सहमती झाली असली तरी, जागावाटपावरुन तिन्ही पक्षांमध्ये खास करुन काँग्रेस आणि Shiv Sena (UBT) यांच्यात जोरदार खेचाखेच झाल्याचे समजते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे समाधान तर शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस (Congress ) देखील राजी झाल्याचे बोलले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, 105 जागा लढवत काँग्रेस मविआमध्ये मोठा भागिदार तर त्या खालोखाल शिवसेना (UBT) 95 आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस 85 जागा लढवणार असे सूत्र निश्चित झाले असून सर्वांची त्यावर सहमती असल्याचे समजते.

बाळासाहेब थोरात यांची शिष्टाई फळास

जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडीमध्ये प्रदीर्घ काळापासून चर्चा सुरु होती. बहुतांश जागांवर एकमत झाले आणि जागावाटप अतिशय मोकळीकीने पार पडले. मात्र, काही जागा अशा होत्या ज्यावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. खास करुन हा संघर्ष दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये निर्माण झाल्याने वाद वाढला होता. एका बाजूला संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी तर जागावाटपावरुन परस्परांवर जाहीर टीका केली होती. परिणामी चर्चेतूनही तोडगा निघत नव्हता. प्रकरण दिल्ली दरबारी पोहोचले. दिल्लीतील काँग्रेस हायकमांडने अंतिम चर्चेसाठी शिष्टाई करण्यासाठी पटोलेंना काहीसे बाजूला करुन ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे जबाबदारी दिली. अखेर त्यांची शिष्टाई फळाला अली असून, सर्वांचे समाधान झाल्याचे समजते. (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections 2024: एकनाथ शिंदे गटाची उमेदवारी यादी जाहीर; अमित ठाकरे विरूद्ध माहिम मध्ये सदा सरवणकरांना तिकीट; पहा 45 उमेदवारांची संपूर्ण यादी)

तोडगा निघाला पण घोळ कायम?

दरम्यान, अशीही चर्चा आहे की, मविआमध्ये जागावाटपाचा तोडगा निघाला असला तरी, काही जागांवर अद्यापही घोळ कायम आहे. ज्यामध्ये विदर्भ आण मुंबईतील काही जागांचा समावेश आहे. परिणामी या जागांवर आज तोडगा निघेल, असे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री झालेल्या बैठकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक बैठक झाली. ज्यामळे बैठकीतील वातावरण अधिक तापले होते. (हेही वाचा, Rift in MVA Alliance: महाराष्ट्रात कॉंग्रेस महाविकास आघाडी सोबतच निवडणूक लढणार; नाना पटोले-संजय राऊत यांच्यामधील वादाच्या चर्चेनंतर Ramesh Chennithala यांनी केलं स्पष्ट)

दुसऱ्या बाजूला भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यातही जागावाटपाच्या मुद्द्यांवरुन संघर्ष आहे. भाजपला सर्वाधिक जागा लढवायच्या आहेत. तर कमी म्हणजे किती जागा आपण घ्यायच्या हा प्रश्न सेना आणि एनसीपी समोर आहे. परिमामी या पक्षांध्येही खेचाकेली पाहायला मिळाली. दरम्यान, आगोदर भाजप आणि त्यापाठोपाठ शिंदेसेनेने आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. अजित पवारही आपली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.