Maha Vikas Aghadi: प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत चर्चा; शरद पवार, संजय राऊत यांनीही दिली प्रतिक्रिया

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shiv Sena) यांच्यात नुकतीच युती झाली. या युतीच्या रुपाने महाविकासआघाडीला (Maha Vikas Aghadi) नवा भिडू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Prakash Ambedkar | (Photo Credit - Twitter)

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shiv Sena) यांच्यात नुकतीच युती झाली. या युतीच्या रुपाने महाविकासआघाडीला (Maha Vikas Aghadi) नवा भिडू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतू, पाठिमागच्या एक दोन दिवसांमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी लावलेला विधानांचा धडाका पाहता महाविकासआघाडीमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मविआचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाने आंबेडकरांच्या विधानावरुन सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. खास करुन प्रकाश आंबेडकर, संजय राऊत (Sanjay Raut) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावर भाष्य केले आहे.

शिवसेना वंचित आघाडीबाबत माहिती नाही- शरद पवार

'शरद पवार हे भाजपचा माणूस आहेत', असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. यावरुन संजय राऊत यांच्यासह अनेकांकडून प्रतिक्रिया आल्या. दरम्यान, शिवसेना आणि वंचित यांच्या आघाडीबाबत विचारले असता शरद पवार यांनी स्पष्टच शब्दांत भूमिका मांडली. शिवसेना आणि वंचित यांच्यात झालेल्या युतीबाबत आपल्याला माहिती नाही. मगाविकास आघाडीत वंचितचा समावेश करण्याबाबत कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे जो प्रस्तावच नाही त्यारुन समवेश होणार की नाही याबाबत चर्चेचे कारणच नाही. शिवसेना आणि वंचित यांच्यातील आघीबाबत आपल्याला माहिती नाही. त्यांच्यासोबतच्या चर्चेत आम्ही सहभागी नव्हतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

महाविकासआघाडीबाबत बोलतना वक्तव्ये जपून करावीत- संजय राऊत

प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन बोलताना महाविकासआघाडीमधील घटकपक्षांबद्दल बोलताना वक्तव्ये जपून करावीत. खास करुन या पक्षांच्या प्रमुख नेत्यांबद्दल बोलताना संयम आणि शब्द जपून वापरावेत, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला होता. यावर प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. त्यावर संजय राऊत यांनी मी कोण हे उद्धव ठाकरे ठरवतील, असे प्रत्युत्तर आंबेडकरांना दिले होते.

कोण संजय राऊत? आंबेडकरांचा सवाल

संजय राऊत यांनी दिलेल्या सल्ल्याबाबत विचारता प्रकाश आंबेडकर यांनी कोण संजय राऊत? असा थेट सवाल विचारला होता. आमची युती शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि नेतृत्व याबाबत जो आदर ठेवायचा तो आम्ही ठेऊ. इतर पक्षांसोबत आमची युती नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही कसे बोलावे हे आम्हाला कोणी सांगू नये, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. त्यामुळे आंबेडकर यांच्या विधानामुळे युतीमध्येच अनेक तर्कवितर्क पाहायला मिळत आहेत.