MAH MBA /MMS CET 2020 Result: महाराष्ट्र एमबीए व एमएमएस सीईटी निकाल जाहीर; cetcell.mahacet.org वर असा पहा तुमचा स्कोअर
cetcell.mahacet.org वर तुमचा स्कोर तपासू शकता.
MAH MBA /MMS CET 2020 Result Announced: महाराष्ट्र सीईटी सेलने आज (23 मे) MAH MBA CET 2020 Scores जाहीर केले आहे. राज्यामध्ये सुमारे 1,10,631 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मार्च महिन्यात 14,15 या तारखेल्या झालेल्या महाराष्ट्र एमबीए सीईटीच्या निकालाकडे अनेक विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान 31 मार्चला हा निकाल विद्यार्थ्यांसाठी जाहीर होणं अपेक्षित होतं. मात्र कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता तो पुढे ढकलण्यात आला. दरम्यान काल महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार आता Maharashtra MBA CET निकाल विद्यार्थ्यांसाठी cetcell.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाला आहे. इथे क्लिक करून थेट पहा तुमचा निकाल.
दरम्यान महाराष्ट्रात मॅनेजमेंट या विषयामध्ये पुढील शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी हा निकाल महत्त्वाचा असतो. यावर त्यांची कॉलेजमधील प्रवेशप्रक्रिया अवलंबून असते. हा निकाल दोन डेसिमल पॉईंटमध्ये जाहीर केला जातो. मग तुम्ही देखील यंदा ही परीक्षा दिली असेल तर पहा तुमचा निकाल कसा आणि कुठे पाहू शकाल?
MAH MBA CET 2020 scores कसा पहाल?
- cetcell.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- होम पेजवर ‘MAH-MBA/MMS CET-2020 result’ही लिंक दिसल्यावर क्लिक करा.
- त्यानंतर पीडीएफ फाईलमध्ये तुमच्या रोल नंबर समोर तुमचा स्कोअर पाहता येईल.
- MAH MBA CET Result तुम्हांला दिसला की तुमचा निकाल सेव्ह करू शकता, डाऊनलोड करू शकता.
दरम्यान सध्या कोरोना व्हायरसचं संकट भारतासह महाराष्ट्र राज्यामध्येही घोंघावत असल्याने सध्या अनेक परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. या परीक्षांमध्ये महाराष्ट्र सीईटी परीक्षांचाही समावेश आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृह खात्याने 10, 12 वी च्या परीक्षा रेड झोनमध्येही पुरेशी खबरदारी घेत लॉकडाऊनमध्येही संचारबंदी शिथिल करण्याचे आदेश दिले आहेत.