Ahmednagar: मधुकर पिचड यांच्या 28 वर्षांच्या सत्तेला सुरुंग; ग्रामपंचायतीपाठोपाठ आगस्ती साखर कारखाना सुद्धा हातातून निसटला
Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखाना (Agasti Sahakari Sakhar Kharkhana) निवडणुकीत पिचड गटाला जोरदार धक्का बसला आहे. ज्येष्ठ भाजप नेते मधुकरराव पीचड (Madhukar Pichad) आणि त्यांचे पूत्र माजी मंत्री वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांच्या गटाचा या निवडणुकीत दणदणीत पराभव झाला आहे.
Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखाना (Agasti Sahakari Sakhar Kharkhana) निवडणुकीत पिचड गटाला जोरदार धक्का बसला आहे. ज्येष्ठ भाजप नेते मधुकरराव पीचड (Madhukar Pichad) आणि त्यांचे पूत्र माजी मंत्री वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांच्या गटाचा या निवडणुकीत दणदणीत पराभव झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभवामुळे झालेल्या जखमांचे व्रण ताजे असतानाच आता कारखाना निवडणुकीतही पराभवाचा जोरदारच झटका बसला आहे. त्यामुळे पिचड गटाला पराभवाच्या वेदना सोसाव्या लागत आहे. मधुकरराव पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासाठी ही निवडणुक म्हणजे अस्तित्वाची लढाई होऊन बसली होती. मात्र, अटीतटीच्या आणि अस्तित्वाच्या लढाईतही पिचड गटाला आपला गड राखता आला नाही. विशेष म्हणजे याच कारखान्यावर पीचड यांची पाठिमागील 28 वर्षे सलग सत्ता होती.
अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर शेतकरी समृद्धी मंडळाची सत्ता आली आहे. या ठिकाणी पिचड यांना शह देण्यासाठी शेतकरी समृद्धी मंडळाने कंबर कसली होती. महत्त्वाचे म्हणजे समृद्धीच्या प्रचारासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही सभा घेतली होती. त्यानंतर समृद्धी मंडळाचाच विजय होणार असा विश्वास सीताराम गायकर यांनी व्यक्त केला होता. गायकर हे एकेकाळी कट्टर पिचड समर्थक आणि त्यांचा उजवा हात म्हणून ओळखले जात होते.
अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या अकोले (Akole) तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी काल (रविवार, 25 सप्टेंबर) मतदान पार पडले. त्यानंतर आज (26 सप्टेंबर) आज लगेचच मतमोजणीही पार पडली. निवडणुक अत्यंत अटीतटीची झाल्याने निकाल काय लागणार याबाबत सर्व जिल्ह्यात उत्सुकता होती. त्यातच ही निवडणूक पिचड पिता पूत्रांसाठी अतिषय प्रतिष्ठेची होती. त्यामुळेही राज्यातील राजकीय वर्तुळाचेही या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. (हेही वाचा, Rajaram Sakhar Karkhana Kolhapur: महादेवराव महाडिक यांना धक्का, सतेज पाटील गटाला निर्णायक बळ, राजाराम कारखान्याचे 1346 सभासद अपात्र)
मधुकरराव पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात असत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांना अनेक महत्त्वाची आणि मानाची पदे मिळाली. असे असले तरी 2019 मध्ये पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आणि ते भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पिचड यांच्या जाण्याने मोठाच राजकीय खड्डा पडला. हा खड्डा भरुन काढण्यासाठी स्वत: शरद पवार रिंगणात उतरले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किरण लहामटे यांच्यावर नेतृत्वाची धुरा दिली आणि रणनिती आखली. परिणामी विधानसभा निवडणुकीत मधुकर पिचड यांच्या पुत्राचा म्हणजेच वैभव पिचड यांचा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या किरण लहामटे यांच्या माध्यमातून पराभव झाला.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीतही मधुकर पिचड यांच्या गटाचा जोरदार पराभव झाला. पाठिमागील चाळीस वर्षे ग्रामपंचायतीवर पिचड यांचीच सत्ता होती. या वेळी मात्र जोरदार परिवर्तन झाले. राजूर ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेत रष्ट्रवादीने तिथे आपला झेंडा फडकावला. अशीच पुनरावृत्ती अकोले तालुक्याची कामधेनू मानल्या जाणाऱ्या अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पाहायला मिळाली. याही ठिकाणी पिचड यांची पिछेहाट झाली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)