Mumbai: मुंबईत नायलॉनच्या मांजामुळे एका पोलीस अधिकाऱ्याचा कापला गळा; थोडक्यात बचावले
यामुळे राज्य सरकारने या मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
नायलॉन मांजाचा (Nylon Manja) वापर पक्षी, प्राणी यांच्यासह नागरिकांसाठीही धोकादायक आहे. यामुळे राज्य सरकारने या मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. परंतु, तरही राज्यात छुप्या पद्धतीने नायलॉनच्या मांजाची विक्री सुरुच आहे. या जीवघेण्या मांज्यामुळे नाशिक आणि नागपूरमध्ये अनेक दुर्घटना घडल्या आहेत. यातच आता मुंबईतही (Mumbai) एका पोलीस अधिकाऱ्याचा मांजामुळे गळा कापल्याची धक्कादायक महिती समोर आली आहे. त्यामध्ये ते थोडक्यात बचावले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण शहरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
राकेश गवळी असे नायलॉनच्या मांजामुळे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गवळी हे मुंबईच्या वरळी पोलीस ठाण्याचे साहय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. गवळी हे शनिवारी दुचाकीवरून जात असताना जे.जे मार्गाजवळी जंक्शनजवळ त्यांच्या गळ्याला नायलॉनचा मांजा आवळला गेला. ज्यामुळे त्याच्या गळ्याला गंभीर जखम झाली. मिळालेल्या माहितीनुसार, गवळी यांच्या गळ्याचे ऑपरेशन करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्या गळ्याला 10 घालण्यात आल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- Nagpur: पतंगाच्या मांजाने घेतला आणखी एकाचा जीव; नागपूर येथे गेल्या 10 दिवसांत तिसरा बळी
राज्य सरकारने 1986 च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम 5 नुसार नायलॉनच्या मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. तरीही अशा मांजाची विक्री आणि वापर केला जात आहे. नायलॉन किंवा चिनी मांजाची विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. हा गुन्हा जामीनपात्र असला तरी यासाठी एक महिना तुरुंगवास किंवा दंड अथवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. तसेच या मांज्यामुळे कोणी जखमी झाल्यास इतर कलमांनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.