LPG Gas Tanker Overturned: मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी गॅस टँकर उलटून वायुगळती; घरे, अंब्याच्या बागेला आग, जीवितहानी नाही
रत्नागिरी येथे मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर उलटला आहे. ज्यामुळे आजूबाजूच्या घारांतील उपकरणे आणि जवळच्या अंब्याच्या बागेला आग लागली.
एलपीजी गॅस वाहून नेणारा टँकर उलटल्याने (LPG Gas Tanker Overturned) मोठ्या प्रमाणावर वायुगळती झाल्याने आजूबाजूच्या घरांतीर उपकरणे आणि नजिकच्या अंब्याच्या बागेला आग लागल्याची घटना घडली आहे. टँकर आणि मिनीबस यांच्यात झालेल्या धडकेमुळे ही घटना रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील (Mumbai-Goa Highway) बाब नदीजवळ मुंबई गोवा महामार्गावर रविवारी (8 जून) सकाळी आठ वाजणेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठ्या शथापीने मदत आणि बचावकार्यास सुरुवात केली. दरम्यान, वायुगळती थांबली असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी सुरक्षेचे उपाय प्रभावीपणे राबवले जात आहेत.
टँकर आणि मिनी बस यांच्यात जोरदार धडक
एलपीजी गॅस वाहून नेणारा टँकर आणि मिनी बस यांच्यात जोरदार धडक झाली. ज्यामुळे टँकर उलटला आणि वायुगळती सुरु झाली. टीव्ही-9 ने थेट प्रक्षेपणाद्वारे दिलेल्या वृत्तानुसार, मिनी बसमध्ये जवळपास 35 ते 40 प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवाशांचा बचाव करण्यात यश आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, बसमधील 6 ते 7 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकूण नुकसाणीची माहिती पुढे आली नसली तरी, झालेल्या वायुगळती आणि त्यामुळे लागलेल्या आगीचा फटका जवळची घरे आणि अंब्यांच्या बागांना बसला. (हेही वाचा -LPG Price Update: अर्थसंकल्पापूर्वी आनंदाची बातमी; एलपीजी सिलेंडर झाला स्वस्त)
घरांमधील काही उपकरणांनी पेट घेतला
वायुगळती झालेल्याने टँकरमधील एलपीजी गॅस परिसरात पसरला. त्यामुळे अपघात घडलेल्या ठिकाणापासून काहीच अंतरावर असलेल्या घरांमधील काही उपकरणांनी पेट घेतला. शिवाय, रस्त्यालगत असलेल्या अंब्यांच्या बागांनाही आग लागल्याची घटना घडली. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तसेच, आगीच्या घटनेमुळे नेमके कोणत्या स्वरुपाचे नुकसान झाले आणि त्यामुळे त्यामुळे काय हानी झाली, याबाबतचा तपशील अद्याप पुढे आला नाही.
LPG गॅस टँकर उलटल्यास काय कराल?
LPG गॅस टँकर उलटल्यास जवळच्या नागरिकांनी त्वरित सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम, घटनास्थळापासून सुरक्षित अंतर ठेवा आणि धूर किंवा गॅस गळती असल्यास त्वरित प्रशासनाला कळवा. कोणत्याही प्रकारे ज्वलनशिल पदार्थ पेटवून नका, आग लावू नका, जसे की सिगारेट ओढणे किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालू करणे. आगीच्या ठिकाणी घटनास्थळी गर्दी करू नका आणि आपत्कालीन सेवांना मार्ग मोकळा करून द्या. गॅसचा वास आल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी जा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2025 10:26 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

