शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे मराठी भाषेतून शपथ घेणार

यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने 18 जागा जिंकल्या.

Shrikant Shinde (Photo Credits: File Photo)

अलिकडेच लोकसभा निवडणूक 2019 चा निकाल जाहीर झाला. यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने 18 जागा जिंकल्या. तर भाजप पक्षाला 23 जागा जिंकण्यात यश आले. महाराष्ट्रात नव्हे तर देशात भाजप पक्षाने बाजी मारली असून पुन्हा मोदी सरकार सत्तेत येणार आहे. 30 मे रोजी सायंकाळी 7 वाजता मोदी सरकारचा शपथ विधी पार पडणार आहे. यात कल्याण मतदारसंघातून निवडणून आलेले शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे मराठी भाषेतून शपथ घेणार आहेत.

सोमवारी रात्री श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, "खासदार शपथ घेण्यासाठी आपल्या आवडीच्या भाषेची निवड करु शकतात. आम्हांला आमच्या मराठी भाषेचा आणि मातृभूमीचा प्रचंड अभिमान आहे. त्याचबरोबर शिवसेनेचा उदय मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जपणूक करण्यासाठी झाला आहे. त्यामुळे आमचे सर्व खासदार मराठी भाषेतून शपथ घेणार."

लोकसभा निवडणूकीतील विजयानंतर भाजपा-शिवसेना युती महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. या निवडणूका ऑक्टोबर महिन्यात पार पडतील. 17 व्या लोकसभेचे पहिले सत्र 6 जून पासून सुरु होणार असून 15 जून पर्यंत चालेल.