Loksabha Elections 2019: अहमदनगर येथील सभेत मोदींचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल; पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचा विश्वास
मोदी आज अहमदनगरमधील सुजय विखे पाटील यांच्या प्रचारसभेत सभेत बोलत होते.
2014 पेक्षा यंदा अधिक स्नेह मिळाले. 2014 पेक्षाच्या तुलनेत यंदा दुप्पटीहून अधिक लोक सभेला उपस्थित असल्याने या प्रेमाला विश्वासाला मोदींनी प्रणाम करत भाषणाला सुरुवात केली. मोदी आज अहमदनगरमधील सुजय विखे पाटील यांच्या प्रचारसभेत सभेत बोलत होते.
5 वर्षात भारत 'महाशक्ती' म्हणून ओळखला जावू लागला, असे सांगत तुम्हाला प्रामाणिक चौकीदार हवा आहे की भष्ट्राचारी? असा सवाल मोदींनी उपस्थितींना विचारला. यूपीए सरकारच्या काळात फक्त घोटाळे झाले. पूर्वीचं सरकार कमकूवत होतं पण आता मजबूत सरकारवर खूश आहात ना? मग यापुढे नेमकं कसं सरकार तुम्हाला हवं आहे, हे तुम्हीच ठरवा, असेही मोदी म्हणाले.
ANI ट्विट:
यंदाही त्यांनी शरद पवारांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या नावाखाली जनतेच्या डोळ्यात धुळफेक करत असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
पाच वर्षात लोकांना घरं, शौचालयं, वीज मिळाली. LPG गॅस कनेक्शन मिळालं. कारण तुम्ही प्रामाणिक सरकारला मतं दिली. प्रलंबित प्रकल्प गेल्या 5 वर्षात पूर्ण झाले. शेतकऱ्यांना किसान निधी योजनेअंतर्गत मदत मिळत आहे, असं सांगून मोदींनी आपल्या कार्याचा पाढा वाचला. तसंच 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शनही मिळणार आहे. ऊस शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. पाण्याच्या नियोजनासाठी जलमंत्रालय स्थापन करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसंच 'काँग्रेस हटवा, गरीबी हटवा' असा नाराही मोदींनी यावेळी दिला.
सुजय विखेंच्या माध्यमातून काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचे सांगत 2014 पेक्षा अधिक मतांनी यंदा जिंकण्याचा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांना यावेळी बोलताना दिला. मोदींच्या पाठी संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिलं असेही ते म्हणाले. (लातूर येथील सभेतून पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना मोदींचे आवाहन; युतीनंतर नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे प्रथमच एका मंचावर)
राज्यासह देशात लोकसभा निवडणूक 2019 (Loksabha Elections 2019) चे नगारे वाजत आहेत. कालच पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. मात्र राज्यातील अजून मतदानाचे तीन टप्पे पार पडायचे आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा घेताना दिसत आहेत.