Lok Sabha Elections Results 2019 TV9 LIVE NEWS STREAMING: लोकसभा निवडणूक निकाल 2019, इथे पहा लाईव्ह
देशामध्ये यंदा 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं. या मतदानाची मतमोजणी आज देशात पार पडते आहे
लोकसभा निवडणूक 2019 (Loksabha Elections 2019) मधील बहुप्रतीक्षित निकाल आज लागणार असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात होणार आहे. यंदा लोकसभेची निवडणूक देशभरात सात व महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले होते. यानुसार महाराष्ट्रात क्रमशः 11 , 18 , 23 आणि 29 एप्रिल रोजी 48 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले होते. यामध्ये झालेल्या मतांची मोजणी सुरु होऊन आता काहीच वेळात मताधिक्यांचे निकाल हाती येण्यास सुरवात होईल. दरम्यान, निवडणूक मतदानांनंतर समोर आलेल्या एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेससाठी प्रतिकूल अंदाज दर्शवले आहेत.
यंदाच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध आघाडीची जोरदार लढत पाहायला मिळाली होते त्यामुळे महाराष्ट्राचा कौल कोणाला मिळतो हे पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहचली आहे. TV9 ने सादर केलेल्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात भाजपला 19, शिवसेना 15, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच याप्रमाणे निकाल लागल्यास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. . TV9 एक्झिट पोल खरा ठरणार का आणि यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात काय बदल घडणार हे जाणून घेण्यासाठी पहा TV9 चं लाईव्ह इलेक्शन कव्हरेज
TV9 लाईव्ह इलेक्शन कव्हरेज
देशामध्ये यंदा 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं. या मतदानाची मतमोजणी आज देशात पार पडते आहे. एकूण 543 पैकी 542 जागांसाठी पार पडलेल्या मतदानामध्ये देशात आणि महाराष्ट्रात कोणत्या पक्षाची सत्ता स्थापन होणार याच्या अंतिम निकालासाठी अजून काही तास वाट पहावी लागणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)