शिर्डी लोकसभा मतदारसंघ: शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे पुन्हा विजयी होणार की काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे बाजी मारणार?

आताच्या (2019) निवडणुकीतही शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांना तिकीट दिले आहे. तर, त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kamble) रिंगणात आहेत. तर, बहुजन वंजित आघाडी (VBA) अरुण साबळे (Arun Sabne) यांच्या रुपात निवडणूक लढवत आहे.

Sadashiv Lokhande, Bhausaheb Kamble | (file photo )

Lok Sabha Elections 2019: शिर्डी लोकसभा मतदारसंघ (Shirdi Lok Sabha Constituency) म्हटलं की आठवते ते विखे पाटील कुटुंब. दिवंगत काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील (Balasaheb Vikhe Patil) यांनी या मतदारसंघातून एक-दोन नव्हे तर तब्बल 9 वेळा या मतदारसंघातून लोकसभेसाठी प्रतिनिधित्व केले आहे. मतदारसंघ फेररचना झाली आणि हा मतदारसंघ अनुसुचीत जातींसाठी राखवी झाला. लोकसभा निवडणूक 2019 मध्येही हा मतदारसंघ राखीवच आहे. त्यामुळे विखे पाटील कुटुंबीयांना अहमदनगर मतदारसंघाचा आश्रय घ्यावा लागला. त्यावरुन झालेले विचित्र राजकारणही त्या निमित्ताने महाराष्ट्राने जवळून पाहिले. तर, अशा या मतदारसंघात 2014 मध्ये शिवसेना उमेदवार निवडणूक आला. आताच्या (2019) निवडणुकीतही शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांना तिकीट दिले आहे. तर, त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kamble) रिंगणात आहेत. तर, बहुजन वंजित आघाडी (VBA) अरुण साबळे (Arun Sabne) यांच्या रुपात निवडणूक लढवत आहे.

एकूण 28 उमेदवार रिंगणात

शिर्डी मतदारसंघामध्ये एकूण 28 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे

कांबळे भाऊसाहेब मल्हारी (इंडियन नँशनल काँग्रेस), बन्सी भाऊराव सातपुते (भारतीय कम्युनिस्ट पार्टी), सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना), सुरेश एकनाथ जगधने (बहुजन समाज पार्टी), अशोक जगदीश जाधव (राष्ट्रीय मराठा पार्टी), प्रकाश कचरु आहेर (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी ), विजय ज्ञानोबा घाटे (रिपब्लिकन बहुजन सेना), संजय लक्ष्मण सुखदान (वंचित बहुजन आघाडी), ॲड.अमोलिक गोविंद बाबुराव (अपक्ष ), डॉ. अरुण प्रभाकर साबळे (अपक्ष), अशोक अनाजी वाकचौरे (अपक्ष), किशोर लिंबाजी रोकडे (अपक्ष), क्रांती अरुण साबळे (अपक्ष), गणपत मच्छिंद्र मोरे ( अपक्ष), गायकवाड अशोक रामचंद्र (अपक्ष), प्रदिप सुनिल सरोदे (अपक्ष ), बागूल भुमिका आशिष (अपक्ष ), बापू पाराजी रणधीर (अपक्ष ), बोरगे शंकर हरिभाऊ (अपक्ष ), भाऊसाहेब जयराम वाकचौरे (अपक्ष), राजेंद्र रत्नाकर वाकचौरे (अपक्ष), वाकचौरे भाऊसाहेब राजाराम (अपक्ष ), वाघमारे प्रकाश गुलाब (अपक्ष ), सचिन सदाशिव गवांदे (अपक्ष ), सदाशिव रामचंद्र वाकचौरे (अपक्ष), सरोदे अंबादास लक्ष्मण (अपक्ष), सुभाष दादा त्रिभुवन (अपक्ष), संपत खंडू समिंदर (अपक्ष) वैध ठरले आहेत. (हेही वाचा, (हेही वाचा, महाराष्ट्राचे राजकारण ढवळून टाकणारे बहुचर्चीत लोकसभा मतदारसंघ आणि लक्ष्यवेधी लढती))

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ