Lok Sabha Elections 2019: शिवसेना पक्षाची पहिली 21 उमेदवार यादी जाहीर, पालघर आणि सातारा या दोन जागांवर तिढा कायम

पालघर आणि सातारा या दोन मतदार संघातील उमेदवाराचं नाव रविवारी जाहीर होणार

Shivsena (Photo Credits: PTI)

Shiv Sena Candidate List For Lok Sabha Election 2019: लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर होलाष्टकामुळे आणि भाजपामध्ये सुरू असलेल्या उमेदवारांच्या इन्कमिंगमुळे अखेर काल (21 मार्च) पहिली उमेदवार यादी जाहीर झाले. भाजपाने पहिल्या यादीमध्ये 15 उमेदवारांची नावं जाहीर केल्यानंतर आज शिवसेनेने देखील पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये शिवसेनेच्या हेमंत गोडसे (Hemant Godse), चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire), अरविंद सावंत (Arvind Jadhav),  यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. शिवसेनेने 21 नावं जाहीर केली आहेत. पालघर आणि सातारा या दोन जागांवर रविवारी घोषणा होणार आहे. Lok Sabha Elections 2019: 'भाजप'ची पहिली उमेदवार यादी जाहीर; महाराष्ट्रात या लोकांना मिळाली उमेदवारी

लोकसभा निवडणूक 2019 चे शिवसेनेचे पहिले  21 उमेदवार  

1) दक्षिण मुंबई - अरविंद सावंत

2) दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे

3) उत्तर पश्चिम - गजानन कीर्तिकर

4) ठाणे - राजन विचारे

5) कल्याण - श्रीकांत शिंदे

6) रायगड - अनंत गिते

7) रत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक राऊत

8) कोल्हापूर - संजय मंडलिक

9) हातकणंगले - धैर्यशिल माने

10) नाशिक - हेमंत गोडसे

11) शिर्डी - सदाशिव लोखंडे

12) शिरुर - शिवाजीराव आढळराव-पाटील

13) औरंगाबाद - चंद्रकांत खैरे

14) यवतमाळ-वाशिम - भावना गवळी

15) बुलढाणा - प्रतापराव जाधव

16) रामटेक - कृपाल तुमाने

17) अमरावती- आनंदराव अडसूळ

18) परभणी- संजय जाधव

19) मावळ - श्रीरंग बारणे

20) हिंगोली-हेमंत पाटील

21) उस्मानाबाद-ओमराजे निंबाळकर

कोल्हापुरला रविवारी 24 मार्चला शिवसेना-भाजपा युतीचा पहिली सभा होईल. या सभेला देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या सभेतच पालघर आणि सातारा  येथिल उमेदवार जाहीर होणार आहे.

लोकसभा निवडणूकीसाठी यंदादेखील भाजपा आणि शिवसेनेची युती आहे. 23 जागा शिवसेना तर 25 जागा भाजपा लढणार आहे. आगामी लोकसभा निवडणूक देशात 7  टप्प्यांमध्ये होणार,  महाराष्ट्रात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.  मतमोजणी 23 मे 2019 दिवशी होणार आहे.