Lok Sabha Elections 2019: शरद पवार यांचे राजकरण संपवणार, चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा
पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे राजकरण संपवणार असल्याचा इशारा केंद्रीय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला आहे.
Lok Sabha Elections 2019: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला उद्धवस्त करुन पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे राजकरण संपवणार असल्याचा इशारा केंद्रीय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला आहे. तसेच बोटावर मोजण्याइतकेच खासदार असूनही राष्ट्रीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठेपणा करत असल्याचे सुद्धा पाटील यांनी म्हटले आहे.
सांगोला येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्याच्या बैठकीत माढा (Madha) लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचार्थ सभेत पाटील यांनी असे वक्तव्य केले आहे. माढा येथून पराभ होणार असल्याचे अगोदरच कळल्यामुळे शरद पवार यांनी लोकसभा निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला असून संजय शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.(हेही वाचा-गुजरातमध्ये स्वबळावर राष्ट्रवादी लढवणार सर्वच्या सर्व जागा; जागावाटपाच्या वाटाघाटींवर एकमत न झाल्याने घेतला निर्णय)
उमेदवार नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करत दुष्काळग्रस्त जनतेच्या भावनेशी खेळवल्या जाणाऱ्या बारामती मधील जनतेला आणि राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखवून देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच निवडणुकीत विरोधात असणारे मोहिते-पाटील कुटुंब आणि शहाजीबापू पाटील महायुतीसोबत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.