मानखुर्द येथे भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
मानखुर्द येथील भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त राडा शनिवारी रात्री झाला.
जळगाव (Jalgaon) येथील भाजप कार्यकर्त्यांच्या मारहाणीची घटना ताजी असताना शनिवारी रात्री मानखुर्द (Mankhurd) येथील भाजप (BJP) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त राडा झाला. तर दोन गटात मानपानावरुन मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेवेळी भाजप-शिवसेना पक्षाचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचार कार्यकलयाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आपल्या नेत्याने नाव घेतल्याने कार्यकर्ते भडकले आणि एकमेकांसोबत त्यांनी भिडण्यास सुरुवात केली. वाद एवढा वाढला की त्यामध्ये दोन जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.(हेही वाचा-जळगाव: भाजप माजी आमदारास मारहाण, गिरीश महाजन यांना धक्काबुक्की; अमळनेर येथे पक्ष मेळाव्यात जोरदार राडा (Video)
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र दोन गटातील वादामुळे कोणाचीही तक्रार करण्यात आली नाही आहे. तर पोलिसांकडून लवकरच कारवाई केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2019 01:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

