Lok Sabha Election 2019: आजपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरु होणार

आज सोमवार (18 मार्च) पासून निवडणुकीची प्रक्रिया सुरु होणार असून देशाच्या 91 मतदार संघातील निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे.

EVM Machine (Photo Credits-Twitter)

Lok Sabha Election 2019: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा निवडणुक आयोगाने स्पष्ट केल्यानंतर आता राजकीय पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. तत्पूर्वी आज सोमवार (18 मार्च) पासून निवडणुकीची प्रक्रिया सुरु होणार असून देशाच्या 91 मतदार संघातील निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे. तसेच राज्यातील सात मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली जाणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुक सात टप्प्यात होणार आहे. तर महाराष्ट्रात ती चार टप्प्यात होणार आहे. येत्या 11 एप्रिल पासून पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असून 91 मतदार संघातील निवडणुक प्रक्रियेची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. तर 18 ते 25 मार्च या दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ देऊ केला आहे. तसेच 26 मार्च रोजी उमेदवारांनी केलेल्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. मात्र ज्या उमेदवारांना माघार घ्यायची असल्यास त्यांच्यासाठी 28 मार्च पर्यंत देण्यात आली आहे.(हेही वाचा-SSC, HSC बोर्डाच्या शिक्षकांना निवडणूकीच्या कामातून वगळले; परिपत्रकातून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश)

नागपूर,वर्धा, रामटेक,भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ आणि वाशिम या विदर्भातील सात मतदार संघामध्ये 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर सातपैकी भाजप-शिवसेना युतीमधील पाच मतदार संघ भाजपकडे असणार असून दोन शिवसेनेला देण्यात आले आहेत. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी सहा मतदार संघ काँग्रेला दिले असून भंडारा-गोंदिया मतदार संघ राष्ट्रवादीला देण्यात आला आहे.