खा. सुजय विखे पाटील यांची वडील राधाकृष्ण विखे पाटील यांना ऑफर, 'आता काँग्रेस सोडा, भाजपमध्ये या'
त्यामुळे भाजपच्या वैचारिकतेशी आपले जुळेल काय ? असा सवाल विचारला असता. 'मी तसा राजकारणातला माणूस नाही. मी आताच राजकारणात आलो. त्यामुळे मला तशी कोणतीही वैचारिक भूमिका नाही. मला सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत असे वाटते. त्यामुळे मला तसा वैचारिकतेची अडचण येणार नाही', असेही सुजय विखे पाटील म्हणाले.
Lok Sabha Election Results 2019: 'वडील राधाकृष्ण पाटील यांनी आता भाजपमध्ये यावे' अशी विनंतीवजा ऑफर भाजपचे अहमदनगर येथील नवनिर्वाचीत खासदार सुजय विखे पाटील यांनी काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीस आघाडी करुन सामोरे गेले. या वेळी जागावाटपात अहमदनगची जागा राष्ट्रवादीकडे गेली आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आणि खासदार म्हणून ते निवडणूनही आले.
लोकसभा निवडणूक निकाल लागल्यनंतर खा. डॉ. सुजय विखे पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एबीपी माझा या वृत्तवाहिणीशी बोलताना ते म्हणाले, 'भाजपमध्ये जाण्याचा माझा निर्णय सुरुवातील माझ्या वडीलांना (राधाकृष्ण विखे पाटील) यांना फारसा आवडला नव्हता. मात्र, आता महाराष्ट्र आणि देशभरातील निकाल पाहिल्यानंतर तुमचा निर्णय योग्य होता असेही ते म्हणाले. त्यानंतर मीह त्यांना मझा निर्णय योग्य होता असे वाटत असेल तर, आपणही भाजपमध्ये यावे अशी विनंती मी त्यांना केली', असे सुजय विखे यांनी सांगितले. काँग्रेसकडून आम्हाला चांगली वागणूक मिळाली नाही, असेही ते या वेळी म्हणाले. (हेही वाचा, राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार संजय शिंदे यांच्या पराभवाच्या दु:खात कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न)
मला कोणतीही वैचारिक भूमिका नाही - सुजय विखे पाटील
दरम्यान, आपण काँग्रेसमध्ये वाढलात. त्यामुळे भाजपच्या वैचारिकतेशी आपले जुळेल काय ? असा सवाल विचारला असता. 'मी तसा राजकारणातला माणूस नाही. मी आताच राजकारणात आलो. त्यामुळे मला तशी कोणतीही वैचारिक भूमिका नाही. मला सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत असे वाटते. त्यामुळे मला तसा वैचारिकतेची अडचण येणार नाही', असेही सुजय विखे पाटील म्हणाले.