Lok Sabha Election 2024: EVM मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये अज्ञात व्यक्तीकडून घुसखोरी, निलेश लंकेंकडून व्हीडिओ ट्विट करत गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमचे सीसीटीव्ही फुटेज दाखवणारा मॉनिटर बंद पडला होता.

शरद पवार गटाचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी एक व्हीडिओ ट्विट करत अहमदनगरच्या स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आलेल्या EVM मशीन्सच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. (हेही वाचा - Election Commission Clarification On Polling In Mumbai: मुंबईमध्ये मतदान केंद्रावर रांगाच रांगा, निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण; उद्धव ठाकरे यांचा घणाघात, वाचा सविस्तर)

निलेश लंके यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस गोदामापर्यंत आलाय. काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्हीमध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला. माझ्या सहकाऱ्याने तो लगेच हाणून पाडला. माझे सहकारी हा इसम पकडू शकतात. मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातंय. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, अशी टीका निलेश लंके यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमचे सीसीटीव्ही फुटेज दाखवणारा मॉनिटर बंद पडला होता. तब्बल अर्धा तास हे सीसीटीव्ही फुटेज दिसत नव्हते. त्यामुळे रोहित पवार आणि शरद पवार  गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या अशा घटनामुळे महाविकास आघाडी निवडणूक आयोगावर टीका करत आहे.