Lok Sabha Elction 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी; शरद पवारांचा मॅरेथॉन दौरा, 22 दिवसात राज्यात 50 सभा, रॅली आणि बैठकांचं आयोजन
शरद पवारदेखील प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. 22 दिवसात त्यांच्या राज्यात 50 सभा होणार आहेत. त्याशिवाय, रॅली आणि बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे.
Lok Sabha Elction 2024 : राज्यभरात लोकसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी पाहायला मिळत आहे. 82 वर्षांचे तरूण शरद पवार यांच्या सभा देखील लवकरच सरू होणार आहेत. ११ मेपर्यंत ते राज्यभरात मॅरेथॉन दौरा करतील. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. अशामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या देखील राज्यभर सभा पार पडणार आहेत. (हेही वाचा :Shiv Sena (UBT) Campaign Song: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत प्रचार गीत प्रदर्शित (Watch Video) )
ठिकठिकाणी शरद पवार यांच्या सभा, रॅली आणि बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ दिवसांमध्ये त्यांच्या राज्यभर ५० सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. १८ एप्रिलपासून बारामतीतून शरद पवार यांच्या सभांना सुरुवात होणार आहे. ११ मेपर्यंत ते राज्यभरात मॅरेथॉन दौरा करतील.
शरद पवार दिवसाला ३ ते ४ सभा घेणार आहेत. रावेर, शिरूर, बीड, पुणे अहमदनगर, बारामती, माढा, सातारा, कोल्हापूर,औरंगाबाद येथे शरद पवारांच्या या सभा होणार आहेत. भाजपकडून आज सातारा मतदार संघासाठी उदयानराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आता शरद पवार साताऱ्यातून कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हान यांना शरद पवार संधी देतील अशा चर्चा रंगल्या होत्या.