Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची बलाबल काय? घ्या जाणून खासदारांची संख्या
म्हणूनच आम्ही लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी राज्यातील खासदारांच्या एकूण 48 जागांपैकी राजकीय पक्षांकडील खासदारांची विद्यमान संख्या आणि ताकदीवर दृष्टीक्षेप टाकला.
Number of MPs in Maharashtra: महाराष्ट्र पुढच्या अवघ्या काही दिवसांमध्येच लोकसभा निवडणूक 2024 ला सामोरा जात आहे. राज्य आणि देशाच्या इतिहासासाठी ही निवडणूक अभूतपूर्व असेल. केंद्रीय निवडणूक आयोग या निवडणुकीसाठी लवकरच कार्यक्रम (Lok Sabha Election 2024 dates) जारी करेन. त्याबाबात उत्सुकता आहेच. या सर्वांमध्ये राज्यातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची विद्यामान स्थिती कशी आहे. कोणत्या पक्षाकडे किती खासदार आहेत. पक्षीय बलाबल कशी याबाबत सामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. म्हणूनच आम्ही लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी राज्यातील खासदारांच्या एकूण 48 जागांपैकी राजकीय पक्षांकडील खासदारांची विद्यमान संख्या आणि ताकदीवर दृष्टीक्षेप टाकला. (Political Parties in Maharashtra)
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा फूट
लोकसभा निवडणूक 2019 निकाल जेव्हा आला तेव्हाची आणि आताची स्थिती यामध्ये प्रचंड अंतर आहे. कारण या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या खासदारांची संख्या एकत्र होती. शिवसेना तर राज्यातील क्रमांक दोनचा पक्ष होता. आता तर स्थितीच वेगळी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची दोन वेगळी शकलं झाली आहेत. एका बाजूला उद्धव ठाकरे (शिवसेना-UBT) आणि एकनाथ शिंदे (शिवसेना) दुसऱ्या बाजूला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांचा आणि अजित पवार यांचा गट वेगवेगळ्या बाजूला अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यांच्यातील खासदारांची संख्याही कमालीची विभागली गेली आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे राष्ट्रीय पक्ष मात्र स्थिर आहेत. (हेही वाचा, MLA Disqualification Case: सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटाला मोठा दणका, दोन आठवड्यात म्हणणं सादर करण्याचे निर्देश)
महाराष्ट्रातील राजकीय पक्षांकडली खासदारांची बलाबल
भाजप- 23
शिवसेना (UBT)- 05
शिवसेना (शिंदे गट)- 13
राष्ट्रवादी- 4
काँग्रेस- 1
MIM- 1
अपक्ष- 1
एकूण- 48
राज्यातील राजकीय पक्षांची होत असलेली फाटाफूट विचारात घेता आगामी निवडणुकीमध्ये वेगवेगळी समिकरणे पाहायला मिळू शकतात. जसेक की महायुती विरुद्ध इंडिया आघाडी ज्याला महाराष्ट्रात महाविकासआघाडी असेही म्हटले जाऊ शकते. महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख आहेत. महायुतीमध्ये इतरही काही छोटे घटक पक्ष आहेत. दुसऱ्या बाजूला महाविकासआघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिसवेसना (UBT), शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस हे प्रमुख राजकीय पक्ष आहेत. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचाही समावेश आहे.