Mumbai University Exams : लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; नवीन वेळापत्रक पाहून घ्या

लोकसभा निवडणुकीचा परिणाम मुंबई विद्यापीठाकडून उन्हाळी सत्रामध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांवरही झाल्याचं दिसत आहे. कारण मुंबई विद्यापीठाच्या उन्हीळी परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Mumbai University Exams : लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; नवीन वेळापत्रक पाहून घ्या
Mumbai University | (Photo Credits: mu.ac.in)

Mumbai University Exams : देशात सध्या लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) सुरू आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान पार पडत आहे. त्यात मुंबई-कोकण विभागात 7 मे रोजी मतदान होणार आहे. त्याचा परिणाम मुंबई विद्यापीठ (Mumbai University) कडून घेण्यात येणाऱ्या काही परिक्षांवर झाला आहे. 6,7 आणि 13 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 अंतर्गत होणाऱ्या 6,7 आणि 13 मे रोजीच्या परिक्षा 18 मे, 25 मे, 8जून रोजी घेण्यात येणार आहेत. (हेही वाचा :Mumbai University Senate Elections: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित)

देशभरात पहिल्या दोन टप्प्यासाठी मतदान पार पडले आहे. आता तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील प्रचारासाठी नेते मंडळींनी जोर धरला आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 7 मे रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, रत्नागिरी मतदारसंघांपैकी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जिलह्यांमध्ये मतदान प्रक्रीय पार पडत आहे. त्याशिवाय, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईमधल्या एकूण ६ मतदारसंघांमध्ये मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी कोणत्याही परीक्षा घेतल्या जाणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ परीक्षांच्या तारखांमध्येच बदल करण्यात आला आहे. परीक्षेची वेळ आणि केंद्र यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. हे वेळापत्रक मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सर्व महाविद्यालयांना लागू असणार, असं विद्यापीठाने स्पष्ट केलं आहे. 6 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा आता 18 मे रोजी होणार आहे. तर 7 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा 25 मे रोजी धेण्यात येणार आहेत. तसेच 13 मे रोजी ज्या परीक्षा घेण्यात येणार होत्या, त्या थेट 8 जूनला होणार असल्याची माहिती आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 28, 2024 03:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).