Lockdown In Maharashtra: महाराष्ट्रात लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन; राज्यात आतापर्यंत 1 लाख 13 हजार 893 गुन्ह्यांची नोंद
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच लॉकडाउनच्या (Lockdown) काळात प्रत्येक नागरिकांनी सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिक लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन आहेत. यामुळे अशा नागरिकांच्या विरोधात महाराष्ट्र पोलिसांकडून (Maharashtra Police) कायदेशीर कारवाई केली जात आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्रात आतापर्यंत कलम 188 अंतर्गत एकूण 1 लाख 13 हजार 893 गुन्हे दाखल झाले आहेत. तर, 22 हजार 794 जणांना अटक करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरातच बसून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहेत. मात्र काही नागरिक अत्यावश्यक साहित्यांची खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. यामुळे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन होत आहे. एवढेच नव्हेतर, काही नागरिकांच्या गैरजबाबदारीपणामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत कलम 188 अंतर्गत 1 लाख 13 हजार 893 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, 22 हजार 794 जणांना अटक केली आहे. यात अवैध वाहतूक केल्याप्रकरणी 1 हजार 322 गुन्ह्यांचा समावेश आहे. तर, 69 हजार 567 वाहने जप्त करण्यात आली आहे. हे देखील वाचा- कोरोना विषाणूला हरविण्यासाठी मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची नमाज घरीच अदा करावी- उपमुख्यमंत्री अजित पवार
ट्वीट-
देशात येत्या 31 मेपर्यंत लॉकडाउनचे आदेश लागू राहणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच कोणत्याही नागरिकांनी सोशल मीडियाच्य माध्यामातून चुकीच्या माहितीचा प्रसार करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे.