Lockdown: परप्रांतीय कामगारांना परत आणण्याची जबाबदारी कुणाची? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महत्त्वाची प्रतिक्रिया
कोरोनावर जोपर्यंत औषध अथवा लस निघत नाही तोपर्यंत त्याचा प्रसार होणार नाही याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. त्यामुळे नियम पाळूनच काम करावे लागेल, असे गडकरी यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊन (Lockdown) काळात परप्रांतीय कामगार महाराष्ट्रातून आपापल्या राज्यात स्थलांतरीत झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योजकांसमोर मनुष्यबळ टंचाई निर्माण होण्याची भीती अनेकांकडून व्यक्त करण्यात आली. मात्र, ही भीती अनाठाई असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी मोठे भाष्य केले आहे. नितीन (Nitin Gadkari) गडकरी यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील उद्योग हे परप्रांतीय कामगारांवर अवलंबून असल्याचे निर्माण केले जाणारे चीत्र वास्तववादी नाही. राज्यात असलेले परप्रांतीय कामगार हे केवळ 10 ते 12 टक्के आहेत. त्यामुळे या कामगारांना जर परराज्यातून परत आणायचे असेल तर ती जबाबदारी ही उद्योजकांनी घ्यायला हवी, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या संवाधावेळी गडकरी यांनी उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी बोलताना गडकरी म्हणाले की, कोरना व्हायरस संकटाचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. असा काळात यातून मार्ग काढण्यासाठी विदेशी गुंतवणूक भारतात आणणे त्यासाठी आपले तंत्रज्ञान अधिक अद्ययावत करणे आणि जनतेची क्रयशक्ती वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राज्यातील उद्योजकांनी त्या दृष्टीने विचार करायला हवा, अशी भूमीकाही गडकरी यांनी व्यक्त केली. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे अहम भाग्यच, पण नोटबंदी, लॉकडाऊन काळात नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार?- शिवसेना)
पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, काळ मोठा कठीण आहे. राज्याला आणि देशाला एकाच वेळी कोरोना आणि आर्थिक समस्या अशा दोन्ही संकटाविरुद्ध लढायचे आहे. त्यामुळे कोरोनावर जोपर्यंत औषध अथवा लस निघत नाही तोपर्यंत त्याचा प्रसार होणार नाही याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. त्यामुळे नियम पाळूनच काम करावे लागेल, असे गडकरी यांनी म्हटले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 01, 2020 10:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

