Lockdown चा 'असा'ही उपयोग! वाशीम जिल्ह्यातील पती-पत्नीने 21 दिवसात खोदली 25 फुटांची विहीर (See Photos)
वाशीम मधील एका पती- पत्नीने लॉक डाउन मध्ये घरी बसून आपण आळशी होऊ नये म्ह्णून आपल्या घराच्या अंगणात विहीर खोदायचे ठरवले, आणि अथक प्रयत्नाच्या नंतर तब्बल 21 दिवसात 25 फुटांची विहीर त्यांनी खोदून तयार केली आहे
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशभरात 3 मे पर्यंत लॉक डाऊन (Lockdown) जारी करण्यात आले आहे. याकाळात अनेक रोजंदारी कामगारांचे काम बंद आहे. अशावेळी घरी बसल्या काय करायचे हा प्रश्न अनेकांच्या समोर आहे. या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राच्या वाशीम जिल्ह्यातील एका दांपत्याने शोधून काढले. वाशीम मधील या पती- पत्नीने घरी बसून आपण आळशी होऊ नये म्ह्णून आपल्या घराच्या अंगणात विहीर खोदायचे ठरवले, आणि अथक प्रयत्नाच्या नंतर तब्बल 21 दिवसात 25 फुटांची विहीर त्यांनी खोदून तयार केली आहे. ANI ने या विहिरीचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये विहिरीला बरेच पाणी लागल्याचे सुद्धा दिसून येत आहे. Lockdown: एक वर्षाच्या बाळाला कडेवर घेऊन जोडप्याचा नागपूर ते मध्य प्रदेश सायकल प्रवास
प्राप्त माहितीनुसार, वाशीम मधील हे दांपत्य रोजंदारीचे काम करतात, मात्र लॉक डाऊन असल्याने सर्व कामे बंद आहेत, अशावेळी घरात बसून राहून काय करावे असा प्रश्न होता, आपला वेळ उगाच वाया जात आहे याचा खेदही वाटत होता, अशावेळी आपल्याला वेळ घालवता येईल आणि त्याचा सदुपयोग सुद्धा होईल असा मार्ग त्यांनी अवलंबण्याचे ठरवले. आणि आपल्याकडील अगदी मोजकीच साधने घेऊन त्यांनी खोदकामाला सुरुवात केली. यावेळी हाताखाली केवळ चार पाच मित्र आणि नातेवाईक होते कारण बाकीच्यांनी त्यांची ही कल्पना मूर्खाचे लक्षण आहे असे म्हणत हसण्यावारी घेतली होती.
ANI ट्विट
दरम्यान, वाशीम जिल्ह्यात उन्हाळ्याच्या मोसमात पाण्याचे संकट कहाणी नवीन नाही, या विहिरीमुळे मात्र एन उन्हाळा सुरु असताना या पती पत्नीला दिलासा मिळाला आहे.अशातच गावात सुरु असलेली नळ जल योजना ठप्प झाली असताना आता विहिरीतील पाण्याचा गावकऱ्यांना सुद्धा उपयोग होणार आहे. तेव्हा गावातील प्रत्येक जण या पती- पत्नीचे कौतुक करत आहे.