Dry Day List 2019: लोकसभा निवडणूक 2019, राम नवमी, महाराष्ट्र दिन आणि मतमोजणी यामुळे मुंबई, पुणे, ठाणे सह महाराष्ट्रात एपिल-मे महिन्यात 5-7 दिवस ड्राय डे; पहा संपूर्ण यादी
तर देशभरातील सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल 23 मे 2019 दिवशी लागणार आहे.
Maharashtra Dry Day List 2019: 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) देशात सात आणि महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात लोकसभा निवडणूक आणि मतमोजणी पार पडणार असल्याने सुराक्षेच्या कारणास्तव मतदानाच्या काळात 48 तास आधी महाराष्ट्रात 'ड्राय डे' (Dry Day) जाहीर करण्यात आले आहेत. मतदानाच्या सोबतीनेच राम नवमी (Ram Navami), महावीर जयंती (Mahavir Jayanti), महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) अशा सणांची रेलचेल एप्रिल आणि मे महिन्यात असल्याने या काळात महाराष्ट्रात किमान 5-7 दिवस ड्राय डे आहेत. Lok Sabha Election 2019 Dates: मुंबई, पुणे, नाशिक, कोकण मध्ये कधी आहे लोकसभा निवडणूक 2019 मतदान? पहा महाराष्ट्र राज्यातील 48 मतदारसंघाचं संपूर्ण वेळापत्रक
महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यात एप्रिल - मे 2019 मध्ये कधी आहेत 'ड्राय डे'?
-
मुंबई ( 5 दिवस ड्राय डे)
27 एप्रिल 2019, शनिवार - संध्याकाळी सहा वाजल्यापासून
28 एप्रिल 2019, रविवार - संपूर्ण दिवस
29 एप्रिल 2019, सोमवार - संध्याकाळी सहा वाजेपर्यंत (मतदान दिवस)
1 मे 2019, बुधवार- महाराष्ट्र दिन
23 मे 2019, गुरूवार - मतमोजणी
-
ठाणे ( 5 दिवस ड्राय डे)
27 एप्रिल 2019, शनिवार - संध्याकाळी सहा वाजल्यापासून
28 एप्रिल 2019, रविवार - संपूर्ण दिवस
29 एप्रिल 2019, सोमवार - संध्याकाळी सहा वाजेपर्यंत (मतदान दिवस)
1 मे 2019, बुधवार- महाराष्ट्र दिन
23 मे 2019, गुरूवार - मतमोजणी
-
पुणे ( 7 दिवस ड्राय डे)
13 एप्रिल 2019, शनिवार - संपूर्ण दिवस (राम नवमी)
14 एप्रिल 2019, रविवार - संपूर्ण दिवस (आंबेडकर जयंती)
21 एप्रिल 2019, रविवार - संध्याकाळी सहा नंतर
22 एप्रिल 2019, सोमवार - संपूर्ण दिवस
23 एप्रिल 2019, मंगळवार - संध्याकाळी सहा पर्यंत (मतदान दिवस)
1 मे 2019, बुधवार- महाराष्ट्र दिन
23 मे 2019, गुरूवार - मतमोजणी
-
नाशिक (6 दिवस ड्राय डे)
14 एप्रिल 2019, रविवार - संपूर्ण दिवस (आंबेडकर जयंती)
27 एप्रिल 2019, शनिवार - संध्याकाळी सहा वाजल्यापासून
28 एप्रिल 2019, रविवार - संपूर्ण दिवस
29 एप्रिल 2019, सोमवार - संध्याकाळी सहा वाजेपर्यंत (मतदान दिवस)
1 मे 2019, बुधवार- महाराष्ट्र दिन
23 मे 2019, गुरूवार - मतमोजणी
महाराष्ट्रासह देशभरातील ड्राय डे लिस्ट
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान मतमोजणीच्या काळात गैर प्रकार टाळण्यासाठी दारू बंदी घोषित केली जाते. त्यानुसार मतदान असलेल्या भागात 5 किमी पर्यंतच्या भागात दारू बंदी केली जाते. त्यानुसार महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये मतदानाच्या दिवसाच्या 48 तास आधी म्हणजे दोन दिवस आधीपासून ड्राय असेल. त्यासोबत महराष्ट्र दिनी राज्यभरात ड्राय डे आहे. 11,18,23 आणि 29 एप्रिल 2019 यादिवशी महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार आहे. तर देशभरातील निवडणुकीचा निकाल 23 मे 2019 दिवशी लागणार आहे.