Mantralaya Updates: मंत्रालयात दारुच्या बाटल्या आढळल्याने खळबळ, राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश

त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागे या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण मंत्रालय हादरून गेले आहे.

Mantralay (Photo Credits : Facebook)

Liquor bottles Found in Maharashtra Mantralaya: राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात मंगळवारी दारुच्या बाटल्यांचा खच आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागे या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण मंत्रालय हादरून गेले आहे. या घटनेमुळे राज्य सरकारच्या सत्तास्थापनेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच यासंदर्भात माहिती समोर येताच भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारवर हल्ला बोल केला आहे. याप्रकरणी राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे माहिती समोर आली आहे.

नुकताच सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी प्रादेशिक वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी मंत्रालयात आढळेल्या दारूच्या बाटल्याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "माझे वैयक्तिक मत आहे की, मंत्रालयात काही खाजगी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी विविध कामे करत असताना आणल्या असाव्यात. मी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना राज्य प्रशासनाच्या मुख्यालयात दारूच्या बाटल्या मिळाल्याची माहिती देईन. याप्रकरणी सविस्तर चौकशी केली जाणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल", असे त्यांनी म्हटले आहे. त्यावेळी सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे घडले आहे का? असे त्यांना विचारले असता ते म्हणाले की, "सुरक्षा अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या वैध पासशिवाय कोणतीही व्यक्ती मंत्रालयात प्रवेश करू शकत नाही." हे देखील वाचा- Mumbai University UG Course: युजीच्या प्रवेशासाठी 17 ऑगस्टला मुंबई विद्यापीठ करणार पहिली यादी जाहीर, जाणून घ्या कशी पाहता येणार?

मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्याची माहितीनंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. "मंत्रालयासारख्या कडेकोट सुरक्षा असलेल्या वास्तुत दारूच्या बाटल्यांचा खच आढळून येतो, ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी शरमेची आहे. राज्य सरकारने याची तत्काळ चौकशी करावी आणि दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी.” असे फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

"मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? आघाडी सरकार नेमके कोणासाठी काम करत आहे? या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे!" असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.