दादर रेल्वेस्थानकावर उघडणार मोफत दवाखाना, लिलावती रुग्णालयाचा उपक्रम
दादर सारख्या गर्दीच्या ठिकाणी लिलावती या खासगी रुग्णालयाने नागरिकांसाठी मोफत दवाखाना चालू करण्याचे ठरविले आहे.
दादर सारख्या गर्दीच्या ठिकाणी लिलावती आणि संशोधन केंद्र या खासगी रुग्णालयाने नागरिकांसाठी मोफत दवाखाना चालू करण्याचे ठरविले आहे. तसेच दिवसरात्र हा दवाखाना नागरिकांसाठी कोणत्याही परिस्थितीत चालू राहणार असल्याचे ही सांगितले जात आहे.
लिलावती रुग्णालय पुढील पाच वर्षे हा दवाखाना चालू ठेवणार असल्याची प्राथमिक स्वरुपात माहिती दिली जात आहे. तसेच मध्य रेल्वेवर या दवाखान्याची सोय करण्यात येणार आहे. तर या दवाखान्यात डॉक्टरांपासून ते उपचार यंत्रणेपर्यंतची सर्व सुविधा कार्यरत करण्यात येणार आहे. तसेच दादरसह अजून 24 ठिकाणांवर लिलावती रुग्णालय मोफत दवाखाना चालू करणार आहे.
या दवाखान्यामध्ये आपत्कालीन काळजी, रक्त चाचणी आणि सवलीच्या दरात औषधे या सारखी सुविधा उपलब्ध होणार आहे. तर या मोफत दवाखान्याचे बांधकाम सुरु करण्यात आले असून 10 लाख रुपये यासाठी खर्च करणार असल्याचे रुग्णालयाचे वरिष्ठ अजयकुमार यांनी सांगितले आहे.