Maharashtra Rains: गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; पुरामुळे 120 गावांचा संपर्क तुटला

पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड शहरातील बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे, तालुक्यातील 120 गावांचा संपर्क तुटला आहे.

Photo Credit-X

Maharashtra Rains: राज्यात सध्या ठिकठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, सुरु असलेल्या या जोरदार पावसामुळं धरणांमधील (Dam) पाणीपातळीत देखील वाढ होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसापासुन मुसळधार पाऊस सुरू असून गडचिरोली-आष्टी या राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग बंद झाले आहेत. पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड शहरातील बाजारपेठ पाण्याखाली गेली असून तालुक्यातील 120 गावांचा संपर्क तुटला आहे. (हेही वाचा:Tulsi Lake Overflow: मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो (Watch Video) )

दुर्गम ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. घरात पाणी शिरल्याने, रोगराई पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहे. गडचिरोली सीमेलगत छत्तीसगड राज्यातील जगदलपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्याने गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड जवळून वाहणारी इंद्रावती पर्लकोट पामुलगौतम नदी दुथडी भरुन वाहत आहे. पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आलापल्ली-भामरागड रस्ताही बंद झाला आहे. (हेही वाचा: Mumbai Grant Road Building Collapse: ग्रँट रोड दुर्घटनेत इमारतीचा भाग कोसळून एका महिलेचा मृत्यू; 3 जखमी (See Pic and Videos))

त्यामुळे भामरागड येथील बाजारपेठ पाण्याखाली गेले 50 घरांमध्ये पाणी शिरले.अजुनही पाणी वाढत आहे आणकी काही घरे धोकाच्या पातळीवर आहे. सुरक्षितस्थळ सामान हलविण्यात येत आहे. पुराच्या पाण्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. नागपूर जिल्ह्यातही मुसळदार पाऊस होत आहे. उमरेड तालुक्यातील पाचगाव परिसरात संत्र्याची बाग असो किंवा सोयाबीनचे शेत सर्वांना तळ्याचे स्वरूप आले आहे. सोयाबीनची शेत आणि संत्र्याची बाग पूर्णपणे पाण्याखाली गेली असून एका तळ्याचा स्वरूप या बागेला आलेला आहे.