मुंबई: मालाड च्या त्रिवेणी नगर परिसरात भीषण आग, अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल

यासोबत पाण्याचे 4 मोठे टँकरही बोलाविण्यात आले आहे.

Malad Triveni Nagar (Photo Credits: ANI/Twitter)

मुंबईत (Mumbai) अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना सतत कानावर ऐकायला मिळत असतात. त्यात आज संध्याकाळी 6 वाजून 51 मिनिटांनी मुंबईच्या मालाड (Malad) परिसरातील त्रिवेणी नगर (Triveni Nagar) भागात भीषण आग लागल्याची बातमी ऐकायला मिळाली. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या (Fire Bridge) 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. यासोबत पाण्याचे 4 मोठे टँकरही बोलाविण्यात आले आहे. ही आग लेव्हल 2 ची आग असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी सांगितले आहे.

आज संध्याकाळच्या सुमारास मालाडमधील त्रिवेणी नगर येथील गोडाऊनही ही आग लागली. लेव्हल 2 ची आग असल्यामुळे तात्काळ 7 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असून अजूनही आग आटोक्यात आलेली नाही. यात कोणतेही जीवितहानी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.हेदेखील वाचा-Mumbai Fire: प्लास्टिक PVC फिटिंग मटेरियल नेणाऱ्या कंटेनरला मुंब्रा बायपास जवळ आग; RDMC ची टीम, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र एकूणच परिस्थिती पाहता आगीवर नियंत्रण मिळवणे हे अग्निशमन दलासाठी मोठे आव्हान असणार आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांसह 4 जम्बो पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील (Mumbai) नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉल (City Centre Mall) मध्ये भीषण आग (Fire) लागली होती. या आगीमध्ये कोणतीही इजा झालेली नाही किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाही. अचानक लागलेल्या या आगीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.



संबंधित बातम्या

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

Bilaspur Shocker: बिलासपूर जिल्ह्यात कौटुंबिक वादातून अल्पवयीन मुलाने आजीवर झाडल्या गोळ्या, घटनेनंतर म्हणाला 'फ्लावर नहीं फायर हूं मैं'

IND vs AUS 3rd Test 2024 Day 2 Scorecard, Stumps: दुसरऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवले; जसप्रीत बुमराहने धडाकेबाज गोलंदाजी करत घेतले 5 बळी