Sanjay Raut On Love Jihad Law: लव जिहादविरोधात बिहारमध्ये कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात बनवू - संजय राऊत

तसेच बिहारमध्ये भाजप सरकार काय कायदा बनवतं ते पाहणार असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

संजय राऊत (PC - PTI)

Sanjay Raut On Love Jihad Law: लव जिहादविरोधात बिहारमध्ये कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात बनवू. तसेच बिहारमध्ये भाजप सरकार काय कायदा बनवतं ते पाहणार असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याची तयारी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातदेखील लव्ह जिहाद विरोधात कायदा आणावा, अशी मागणी भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

राज्यात 'लव जिहाद' नव्हे, तर कोरोना मुख्य संकट असल्याचंही राऊत यांनी यावेळी म्हटलं. यावेळी संजय राऊत यांना राज्यातील वाढीव वीज बिलांविषयी विचारलं असता यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं त्यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - महाराष्ट्र: वाढीव वीज बिलवाढीविरोधात आज भाजपचे राज्यव्यापी आंदोलन, मनसेकडून दादर मध्ये पोस्टर लावून आक्रमक आंदोलनाचे संकेत)

दरम्यान, वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेल्या भाजप पक्ष आज राज्यव्यापी आंदोलन करत आहे. कोरोना संक्रमण वाढत असताना भाजप विविध मुद्द्यावरून आंदोलन करत आहे. यावर राऊत यांनी टीकास्त्र डागलं आहे. भाजपचं आंदोलन कोरोना रोखण्यासाठी आहे की, वाढवण्यासाठी? असा खोचक सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. वीज बिल सवलतीत मंत्रिमंडळात समन्वयाचा अभाव आहे. महाविकास आघाडीमधील मंत्र्यांकडूनचं विज बिलाच्या सवलतीची घोषणा केली जाते आणि त्यानंतर लगेचचं वीज बिल भरण्याचं आवाहन केलं जातं, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif