IPL Auction 2025 Live

औरंगाबाद: Cidco N1 परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचंं वातावरण; वनविभागाकडून शोध सुरू

औरंगाबादमध्ये (Aurangabad) सिडको एन 1 (Cidco N1) परिसरात बिबट्या दिसल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Leopard | Photo credits: Twitter/ ANI

मुंबई, ठाणे परिसरासह आता राज्यात बिबट्या (Leopard) मानवी वस्तीमध्ये आढळण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आज (3 डिसेंबर) दिवशी औरंगाबादमध्ये (Aurangabad) सिडको एन 1 (Cidco N1) परिसरात बिबट्या दिसल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान वन विभागाचे अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सिडको एन 1 हा औरंगाबाद मधील एक उच्चभ्रू भाग आहे. येथे संभाजी नगर परिसरात आज सकाळी 9 च्या सुमारास नागरिकांना मॉर्निंग वॉक करताना बिबट्या दिसला. त्यांनी तात्काळ ही माहिती वनविभागला दिली. चिकलठाणा औद्योगिक परिसरात असलेल्या जंगलामधून हा बिबट्या आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.   ठाणे: शहापूर तालुक्यामध्ये वाढतेय बिबट्याची दहशत; वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.

ANI Tweet

काही महिन्यांपूर्वी ठाण्यामध्येही कोरम मॉलजवळ ऐन गर्दीच्या ठिकाणी बिबट्या आढळला होता. त्यावेळेस सीसीटीव्ही कॅमेर्‍यामधेय तो कैद झाला होता. त्यानंतर तो तेथून निघून गेला होता. यापूर्वी नाशिकमध्येही अशाप्रकारेच बिबट्या दिसला होता तेव्हा त्याला बेशुद्ध करून शिताफीने पकडण्यात आले होते.