IPL Auction 2025 Live

Leopard Attack In Nashik: अंगणात खेळणार्‍या 4 वर्षांच्या मुलीवर आईच्या डोळ्यांदेखत बिबट्याचा हल्ला; चिमुकलीचा मृत्यू

नाशिकच्या वेळुंजे भागापासून काही अंतरावर असलेल्या ब्राह्मणवाडे गावानजीक वस्तीवर बिबट्याने हल्ला केला आहे.

Leopard प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Wikimedia commons)

नाशिक (Nashik) मध्ये पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) एका चिमुरडीचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे. मानवी वस्तीमध्ये वाढणारी ही बिबट्याची दहशत आता लहान मुलांच्या जीवावर उठलेली महिन्याभरातील ही वेळुंजे परिसरातील दुसरी घटना आहे. महिन्यापूर्वी याच भागात 8 वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यानंतर आता अवघ्या 4 वर्षीय मुलीला बिबट्या तिच्या आईच्या डोळ्यादेखत खेचून घेऊन गेला असल्याची घटना समोर आली आहे. बिबट्याच्या झडपेत या 4 वर्षीय मुलीचा जीव गेला आहे.

नाशिकच्या वेळुंजे भागापासून काही अंतरावर असलेल्या ब्राह्मणवाडे गावानजीक वस्तीवर बिबट्याने हल्ला केला आहे. नयना नवसु कोरडे असे मृत मुलीचं नाव आहे. ब्राम्हणवाडे गावातील मळे परिसरात संध्याकाळी मुलगी खेळत असताना बिबट्याने तिच्यावर झडप घातली. या प्रकारानंतर गावकर्‍यांनी आरडाओरड सुरू केली. वनविभागाला कळवण्यात आलं. त्यानंतर शोधकार्य सुरू झाले. काही वेळातच जखमी अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळला. नक्की वाचा: Leopard Attack: इगतपूरी येथे 55 वर्षीय महिलेवर बिबट्याचा हल्ला .

वेळुंजेसह ब्राम्हणवाडे, धुमोडी हा जंगलाचा भाग आहे. त्यामुळे इथे बिबट्याचा वावर आहे. काही वेळेस बिबटे भक्ष्य शोधण्यासाठी आत येतात आणि मानवी वस्तीवर हल्ले करतात. बिबट्यांच्या मुक्त वावरामुळे आता गावकर्‍यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

नाशिकच्या ओझर मध्ये काही दिवसांपूर्वी असाच एका बिबट्याने हल्ला केला होता. त्यावेळेस गोठ्यात बिबट्या शिरून त्याने वासरावर हल्ला केला होता. या घटनेनंतर जनावरांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.