Leopard Attack In Karad: बिबट्याच्या जबड्यातून पाच वर्षाच्या मुलाची सुखरुप सुटका, वडिलांच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

मात्र, वडिलांनीदाखवलेल्या प्रसंगावधानामुळे चिमूकल्याचे प्राण वाचले आहे. वडिलांनी अक्षरश: मुलाला बिबट्याच्या जबड्यातून सोडवले. सातारा (Satara) जिल्ह्यातील कराड (Karad) तालुक्यात असलेल्या किरपे गावच्या शिवारात ही घटना घडली.

Leopard | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

पाच वर्षांच्या चिमूकल्यावर बिबट्याने शेतात हल्ला (Leopard Attack) केला. मात्र, वडिलांनीदाखवलेल्या प्रसंगावधानामुळे चिमूकल्याचे प्राण वाचले आहे. वडिलांनी अक्षरश: मुलाला बिबट्याच्या जबड्यातून सोडवले. सातारा (Satara) जिल्ह्यातील कराड (Karad) तालुक्यात असलेल्या किरपे गावच्या शिवारात ही घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. तर परिसरात वडील धनंजय देवकर यांच्या धाडसाची चर्चा रंगली आहे. धक्कादायक म्हणजे किरपे गावापासून जवळच असलेल्या येणके गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती.

किरपे गावातील धनंजय देवकर आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा राज हे शेतात गेले होते. शेतातील काम आटोपल्यावर ते सायंकाळी 6 वाजता घरी निघाले होते. दरम्यान, शेतकामसाठी सोबत आणलेल्या साहित्याची राज याच्याकडे होती. तर काही साहित्य वडिलांकडे होते. दरम्यान, वडीलांना साहित्याची जमवाजमव करताना मदत करत असलेला राज साहित्य उचलण्यासाठी खाली वाकला. इतक्यात झुडपात लपून बसलेल्या बिबट्याने राजवर झडप घातली. बिबट्याने राजचा पाय पकडला आणि त्याला खेचून नेऊ लागला. इतक्यात घाबरलेल्या राजने आरडाओरडा केला. (हेही वाचा, Tiger Pulls, Attacks Safari Vehicle In Bannerghatta National Park: वाघाचा पर्यटकांच्या सफारीवर हल्ला)

बिबट्याने आपल्या मुलाला पकडल्याचे वडील धनंजय देवकर यांच्या लक्षात आले. ते घाबरले होते. पण तरीही धाडसाने ते पुढे झाले. त्यांन बिबट्याचा पाटलाग केला. बिबट्याच्या जबड्यातून देवकर यांनी मुलाला मागे खेचले. अखेर बिबट्याला हार मनावी लागली. राजला सोडून बिबट्या पळून गेला. धनंजय देवकर यांनी सांगितले की, त्यांच्या शेताला तारेचे कुंपण आहे. त्यामुळे बिबट्याला राजला घेऊन बिबट्याला उडी मारता आले नाही. त्याची संधी साधत त्यांनी मोठ्या धैर्याने बिबट्याचा सामना केला.