Leopard Attack Video: पुण्यात आंबेगाव तालुक्यात बिबट्याने शेतकर्याच्या घराबाहेरील कुत्र्याचा फडशा पाडला, थरकाप उडवेल असा हा क्षण पाहा
काल सुद्धा असाच एक हल्ला झाला. बिबट्याचा हा हल्ला हा इतका बेसावध आणि भीषण होता की जर हा क्षण कॅमेर्यात कैद झाला नसता तर आपण यावर विश्वास ही ठेवु शकला नसतात.
पुणे (Pune) जिल्ह्यातील आंबेगाव (Aambegaon) तालुक्यातील शिंगवे (Shingave_ परिसरात बिबट्याची (Leopard) दहशत वाढत चालली आहे. काल सुद्धा असाच एक हल्ला झाला. बिबट्याचा हा हल्ला हा इतका बेसावध आणि भीषण होता की जर हा क्षण कॅमेर्यात कैद झाला नसता तर आपण यावर विश्वास ही ठेवु शकला नसतात. प्राप्त माहितीनुसार काल, 20 सप्टेंबर रोजी मध्यरात्री या बिबट्याने शेतकर्याच्या घराबाहेरील कुत्र्यावर हल्ला चढवत त्याचा फडशा पाडला आहे. या शेतकर्याचे नाव काळुराम सहादू लोखंडे असे असुन ते आंबेगाव तालुक्यात शिंंगवे येथे राहतात. काळुराम यांंच्या घराबाहेर उसाची शेती आहे, हा बिबट्या या उसाच्या शेतातुनच बाहेर येताना त्यांंनी अनेकदा पाहिले होते. महाराष्ट्र: नाशिक मधील इंदिरा नगर भागात बिबट्याचा दोघांवर जीवघेणा हल्ला, हे थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद, Watch Video
आश्चर्याची बाब म्हणजे केवळ काळुराम लोखंडे यांच्या घराबाहेर असणार्या कुत्र्यावर हल्ल्याचा हा तिसरा प्रसंग आहे, मागील एका महिन्यातच बिबट्याने हा तिसरा कुत्रा ठार केला आहे. पहिल्या दोन प्रसंंगानंंतर काळूराम यांंनी घराबाहेर सीसीटीव्ही लावला होता. त्यामुळे निदान यावेळेचा प्रसंग रेकॉर्ड झाला आहे. हा व्हिडिओ कमजोर ह्रुदयाच्या व्यक्तींंनी पाहु नयेच.
बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला
दरम्यान यापुर्वी सुद्धा अनेकदा नाशिक, ठाणे, चंंद्रपुर सारख्या भागात बिबट्या पाहायला मिळाले होते. यापुर्वी नाशिक मध्ये अशाच बिबट्याने मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या 12 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला करुन त्याला ठार केले होते तर अनेक शहरी भागात सुद्धा सीसीटीव्ही वर असे बिबटे स्पॉट झाले होते.