Supreme Court On BJP, Congress: सर्वोच्च न्यायालयाची भाजपला चपराक, BMC विरोधीपक्ष नेतेपद काँग्रेस पक्षाकडेच
त्यामुळे भाजप मुंबई महापालिकेत आक्रमक झाली आणि महापालिकेत विरोधी पक्ष नेते पदावर दावा सांगितला. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. पण न्यायालयात भाजपच्या हाती काहीच लागले नाही. न्यायालयाने भाजपची याचिकाच फेटाळून लावली.
मुंबई महापालिका (BMC) विरोधी पक्ष नेतेपदावर दावा सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सर्वोच्च न्यायालयाने चांगलीच चपराक लगावली आहे. सर्वाधिक नगरसेवक असल्याचे सांगत भाजपने बीएमसी विरोधी पक्ष नेते (BMC Opposition Leader) पदावर दावा सांगितला होता. तसेच, काँग्रेस पक्षाकडे असलेले हे पद (BMC Leader of Opposition) आपल्यला मिळावे अशी मागणी करणारी याचिका भाजपने दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून तर लावलीच. परंतू, 'राजकारणात आज एखाद्याचे मित्र असू तर ते उद्या असूच असे नाही' असा टोलाही लगावला.
मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने मिळून लढली होती. त्यानंतर शिवसेनेने सत्ता स्थापन करत मुंबईत महापौर बसवला. या वेळी आम्ही मुंबई महापालिकेत सत्तेत सहभागी होणार नाही. आम्ही पहारेकरी म्हणून काम करणार अशी भूमिका घेत भारतीय जनता पक्षने विरोधी पक्ष नेते पदावरचा दावा सोडून दिला. भाजपच्या तुलनेत अगदीच कमी मोजके नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षाला आयतीच संधी मिळाली. त्यामुळे काँग्रेस पक्षाने या पदावर दावा सांगितला.
दरम्यान, विधानसभा निवडणूक 2019 मध्ये शिवसेना-भाजप यूतीद्वारे लढूनही सत्तास्थापनेत एकत्र आले नाहीत. त्यामुळे भाजप मुंबई महापालिकेत आक्रमक झाली आणि महापालिकेत विरोधी पक्ष नेते पदावर दावा सांगितला. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. पण न्यायालयात भाजपच्या हाती काहीच लागले नाही. न्यायालयाने भाजपची याचिकाच फेटाळून लावली. (हेही वाचा, मुंबई: भायखळ्यातील राणीची बाग 15 फेब्रुवारी पासून पर्यटकांसाठी उघडल्याची शक्यता)
मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल
शिवसेना – 97, भाजप – 83, काँग्रेस – 29, राष्ट्रवादी – 8, समाजवादी पक्ष – 6,मनसे – 1, एमआयएम – 1, अभासे – 1
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपला मोठ्या पराभवाला सामारे जावे लागल्याची प्रतिक्रिया मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली आहे.