Aurangabad: औरंगाबादेत गुंडांची दहशत, उद्योजकांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

यामुळे व्यापारी वर्गांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहले आहे.

CM Uddhav Thackeray, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उद्योजकांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटनेत वाढ होऊ लगल्याने औरंगाबादेत (Aurangabad) गुंडाची दहशत निर्माण झाली आहे. यामुळे व्यापारी वर्गांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहले आहे. औरंगाबादेत उद्योजकांवर सातत्याने हल्ले होत आहेत. यामुळे रोजगारीवर संकट येत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने पाऊले उचलावीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे, देवेंद्र फणडणवीस यांनी लिहलेल्या पत्रात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर (Sambhaji Nagar) असा केले आहे.

दरम्यान, भोगले उद्योग समूहाचे प्रबंध संचालक नित्यानंद भोगले, उत्पादन व्यवस्थापक सोनगीरकर, कार्मिक व्यवस्थापक भूषण व्याहाळकर या तिघांना बाहेरून आलेल्या 15-20 कथित गुंडांनी मारहाण केल्याची घटना 8 ऑगस्ट रोजी घडली होती. त्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे या प्रकरणातील काही आरोपींना अटक झाली आहे. तर, काहीजण फरार आहेत. या घटनेला 2 दिवस उलटले नाहीत, तोच 10 ऑगस्ट रोजी वाळुज एमआयडीसी परिसरात असलेल्या श्री गणेश कोटिंग समूहावर हल्ला झाला होता. हे देखील वाचा- Sanjay Raut On BJP: भाजपची जन आशीर्वाद यात्रा कोविडच्या तीसऱ्या लाटेला निमंत्रण देईल- संजय राऊत

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, “उद्योगनगरी संभाजीनगरमध्ये सातत्याने उद्योजकांवर होत असलेले हल्ले, त्यातून महाराष्ट्राबाहेर जाणारे विपरित चित्र, यामुळे रोजगारांवर येणारी गदा, इत्यादींचा गांभीर्याने विचार करून याबाबत तातडीने पाऊले उचलण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.” अशी माहिती त्यांनी दिली आहे. शिवाय, ट्विटसोबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्र देखील जोडले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट-

औरंगाबाद येथे घडलेल्या या दोन मोठ्या घटनेनंतर जिल्ह्यात इतर छोट्या उद्योगांना अनेक समस्यांना सामोरे जावा लागत आहे. दरम्यान, पेट्रोल भरल्यानंतर पैसे न देणे, हॉलमध्ये जेऊन पैसे न देणे, वाहनांची दुरुस्ती केल्यानंतर पैसे न देणे, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी पुढे येत आहेत. जिल्ह्यात गेल्या 8-10 महिन्यात वाढलेल्या अशा प्रकारच्या तक्रारीनंतर नागरिकांमध्ये उद्योजक चिंतेत आहेत.