Lavni Artist Meena Deshmukh Dies: ज्येष्ठ लावणी नृत्यांगणा मीना देशमुख यांचं अपघाती निधन

Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

पंढरपूर (Pandharpur) जवळ अपघातामध्ये ज्येष्ठ लावणी नृत्यांगणा मीना देशमुख (Meena Deshmukh) यांचं निधन झालं आहे. फॉर्च्युनर गाडीने प्रवास करताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि गाडी 50 फूट खोल कालव्यामध्ये कोसळली. या अपघातामध्ये मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

मोडलिंब कडून पंढरपूरच्या दिशेने जाणारी गाडी काल रात्री कालव्यात कोसळली. यामध्ये मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य जखमींमध्ये त्यांच्यासोअत प्रवास करणारी त्यांची लेक, नात आणि चालक आहेत. तिघांनाही गंभीर जखमा आहेत. दरम्यान रात्रीच्या वेळेस झालेला हा अपघात पाहून आजूबाजूच्या गावातील नागरिक आले. त्यांनी मदत करण्यास सुरूवात केली. गावकर्‍यांनी रूग्णवाहिका बोलावून संबंधितांवर उपचारासाठी नजिकच्या रूग्णालयात नेले. दरम्यान कालव्यात उतरण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने बचाव कार्यामध्ये अडथळा येत होता. पण दोरीच्या मदतीने गावकर्‍यांनी त्यांना बाहेर काढले. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात सार्‍या दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नक्की वाचा: Kalyani Kurale Jadhav Dies: तुझ्यात जीव रंगला मालिकेतील 'या' अभिनेत्रीचे रस्ते अपघातात निधन, कलाविश्वावर पसरली शोककळा .

रात्रीच्या वेळी या रस्त्यावरील अरुंद पुलावरून गाडी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यानं कार या खोल कालव्यात पडली. दरम्यान पंढरपूर- कुर्डूवाडी रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कामामुळे पुलाचा निर्णयअद्याप झाला नाही त्यामुळे तो नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनत असल्याचं मनसे जिल्हा प्रमुख प्रशांत गिड्डे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.