Latur Teacher Suicide With Family: धक्कादायक! लातूर येथील शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या
गंगाखेड शहरापासून जवळच असलेल्या धारखेड येथील गोदावरी नदीवरील पुलाजवळ गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. मसानाजी तुडमे (वय,53), त्यांची पत्नी रंजना तुडमे आणि त्यांची मुलगी अंजली तुडमे (वय,22) हे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किणी कडू येथे राहत होते.
Latur Teacher Suicide With Family: लातूर (Latur) येथील शाळेतील शिक्षक, त्याची पत्नी आणि त्यांच्या मुलीने परभणी जिल्ह्यात (Parbhani District) मालगाडीसमोर उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंगाखेड शहरापासून जवळच असलेल्या धारखेड येथील गोदावरी नदीवरील पुलाजवळ गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. मसानाजी तुडमे (वय,53), त्यांची पत्नी रंजना तुडमे आणि त्यांची मुलगी अंजली तुडमे (वय,22) हे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किणी कडू येथे राहत होते. तुडमे गंगाखेड येथील ममता माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते.
या तिघांवर शुक्रवारी किणी कडू येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेवर स्मशानभूमीत मोठ्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांनी शोक आणि निराशा व्यक्त केली. तुडमे यांच्या जावयाचा गेल्या वर्षी अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून ते नैराश्यात होते, असे तेथील काही गावकऱ्यांनी सांगितले. (हेही वाचा -World Suicide Prevention Day: भारतामध्ये तरुण लोक करतात सर्वाधिक आत्महत्या; मानसिक आरोग्यावरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे- Expert)
प्राप्त माहितीनुसार, मसानाजी तुडमे यांनी पत्नी आणि मुलीसह गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास गंगाखेड शहराजवळील धारखेड येथील गोदावरी नदीवरील पुलाजवळ धावत्या मालगाडीसमोर उडी घेऊन आपलं जीवन संपवलं. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. (हेही वाचा: Rajasthan Shocker: पत्नीच्या रील्सवर येत होत्या अश्लील कमेंट्स; नाराज पतीने केली आत्महत्या, मृत्यूपूर्वी Live करत दिली माहिती)
गेल्या काही वर्षांत भारतात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे ताणतणावाची नवी कारणे समोर आली आहेत. लोक त्यांच्या जवळच्या लोकांची मानसिक स्थिती समजू शकत नाहीत. तसेच कोणाला इतरांची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी वेळ नाही. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त आहे. परंतु, भारतातील काही रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्था आत्महत्येकडे प्रवृत्त झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी कार्यरत आहेत. अशाच काही हेल्पलाइन्सबद्दल जाणून घेऊया. (IIT Student Commits Suicide: IIT दिल्लीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या,पोलिसांकडून तपास सुरु)
आसरा
हेल्पलाइन क्रमांक- 91-22- 27546669
मुंबईस्थित एनजीओ आसरा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि निराश लोकांना मदत करते जे आत्महत्येकडे प्रवृत्त होतात. येथील व्यावसायिक प्रशिक्षित स्वयंसेवक सर्व वयोगटातील लोकांना मदत करतात. या एनजीओचा दावा आहे की त्यांनी आतापर्यंत 8 लाख 10 लोकांना मदत केली आहे. येथे 7570 प्रशिक्षित स्वयंसेवक आहेत. त्यांनी आतापर्यंत 3456 कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)