Mumbai Crime: दिवगंत डेव्हलपर युसुफ लकडावाला यांचा मुलाला अटक, 45 कोटींची फसवणूक केल्याचे प्रकरण
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिवंगत डेव्हलपर आणि फिल्म फायनान्सर युसुफ लकडावाला यांचा मुलगा फिरोज यांला अटक करण्यात आले आहे. तब्बल ४५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
मिळाललेल्या माहितीनुसार, युसुफ लकडावाला यांच्या मुलावर सीए अकबर पीरबॉय यांच्या सोबत अनेक कौटुंबिक मालमत्ता हडप केल्याचा आणि कंपनीच्या शेअरमधील तिच्या सावत्र आईची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मे मध्ये EOW ने फिरोजवर फसवणूक, गुन्हेगारी कट आणि विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल केला.
एका गुन्हेगारी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने युसुफ लकडावाला यांना अटक करण्यात आले होते. त्यावेळी 2021 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. आता त्यांची दुसरी पत्नी शबीना हिने फिरोजविरुध्द EOW मध्ये तक्रार दाखल केली. तक्रारदार शबीना यांंनी सांगितले की, युसुफ आणि तिच्या शेअर्स फिरोजने धोक्याने नावावर करुन घेतले. तब्बल 45 कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. युसुफ जेलमध्ये असताना फिरोजने अनेक मालमत्ता त्यांच्या नावावर केली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)