Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना; अपात्र लाभार्थ्यांचा पर्दाफाश, लाभार्थांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश
लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांपैक हजारोंना वगळण्यात आले आहे. यामध्ये काही सरकारी कर्मचाऱ्यांची समावेश आहे.
महाराष्ट्र राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. योजनेमध्ये अनेक लाभार्थी बेकायदेशीर असल्याचे पुढे आले आहे. महाराष्ट्राच्या मंत्री आदिती तटकरे यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 2,289 सरकारी कर्मचारी चुकून लाभ घेत होते. हे सर्व अपात्र हे सर्व लाभार्थी अपात्र करण्यात आहे आहे. पात्र अर्जदारांनाच मदत मिळेल याची खात्री करण्यासाठी सरकारने कठोर छाननी सुरू ठेवण्याचे वचन दिले आहे
अपात्र लाभार्थ्यांचा खुलासा
महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री यांनी नुकतेच जाहीर केले की, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत 2,289 शासकीय कर्मचारी लाभ घेत होते, जे अपात्र आहेत. ही योजना आर्थिक दुर्बल महिलांना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
योजना लाभार्थ्यांची नियमित तपासणी
शुक्रवारी एक्स (अगोदरचे ट्विटर) वर पोस्ट करताना तटकरे यांनी नमूद केले की, लाभार्थ्यांची तपासणी सातत्याने केली जाणार आहे जेणेकरून कोणतीही गैरवापर होऊ नये.
सुमारे 2 लाख अर्जांची तपासणी केल्यानंतर, 2,289 शासकीय कर्मचारी लाभ घेत असल्याचे ओआढळले. ते अपात्र असल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, असे मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले.
योजनाची सुरुवात आणि उद्देश
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट 2024 मध्ये मुक्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली. 21-65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा ₹1,500 आर्थिक मदत मिळते. मात्र, शासकीय कर्मचारी या योजनेसाठी पात्र नाहीत
सरकारी कर्मचाऱ्यांनीच लाटला योजनेचा लाभ
"लाभार्थ्यांची पडताळणी" ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत सेवार्थ मधील जवळपास २ लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे २२८९ सरकारी कर्मचाऱ्यांनी…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) May 30, 2025
राजकीय प्रभाव आणि आर्थिक ताण
महायुती नेत्यांनी या योजनेचानिवडणुकीतील यशासाठी महत्त्वाचा घटक म्हणून उल्लेख केला आहे, परंतु त्यांनी राज्याच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक ताणही मान्य केला आहे. शासन सुनिश्चित करणार आहे की खरोखर गरजू महिलांनाच मदतीचा लाभ मिळेल. यासाठी काटेकोर तपासणी प्रक्रियराबविण्यात येत आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 31, 2025 02:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

