Kurar Metro Station: भाजप आमदार अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात; कुरार मेट्रो स्टेशन संदर्भातील कारवाईस विरोध
मालाड येथील कुरार मेट्रो रेल्वे स्टेशन कामासाठी एमएमआरडीए काही झोपड्यांवर कारवाई करत आहे. त्यासाठी नागरिकांना रात्री 12 वाजता नोटिसा दिल्याचे समजते. त्यानंतर एमएमआरडीएने मोठ्या पोलिसफाट्यासह सकाळी कारवाईस्थळी धडक दिली आणि पाडकामास सुरुवात केली.
भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांना मुंबई पोलिसांनी अटक केलीआहे. मालाड येथील कुरार कुरार मेट्रो स्टेशन ( Kurar Metro Station) कामांसाठी परिसरातील काही झोपडपट्टींचे पाडकाम करण्या येत होते. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) उपस्थिती शनिवारी (17 जुलै) सुरु असलेल्या या कारवाईस स्थानिकांनी विरोध केला. भाजप आमदार अतुल भातखळकर यांना या कामाबाबत माहिती कळताच त्यांनीही घटनास्थळी दाखल होत कारवाईस विरोध केला. या वेळी पोलिसांनी त्याब्यात घेतले. अतूल भातखळकर यांनी या कारवाईबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे. तसेच, ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
मालाड येथील कुरार मेट्रो रेल्वे स्टेशन कामासाठी एमएमआरडीए काही झोपड्यांवर कारवाई करत आहे. त्यासाठी नागरिकांना रात्री 12 वाजता नोटिसा दिल्याचे समजते. त्यानंतर एमएमआरडीएने मोठ्या पोलिसफाट्यासह सकाळी कारवाईस्थळी धडक दिली आणि पाडकामास सुरुवात केली. स्थानिकांनी या कारवाईस विरोध केला. त्यानंतर आमदार अतुल भातकळकर यांनीही घटनास्थळी जाऊन कारवाईस विरोध केला या वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. (हेही वाचा, Shiv Sena Vs BJP: 'हे सगळे बाबराचे आणि बाबरीचे समर्थक' भाजप आमदार अतुल भातखळकर यांचा विरोधकांना टोला)
अतूल भातखळकर यांनी ट्विटरवरुन दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उदघाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे MMRDA ने तोडली. लोकांना प्रचंड मारहाण केली. या विरोधात आवाज बुलंद केल्याबद्दल मला अटक करून आरे पोलीस ठाण्यात नेत आहेत. भातखळकर यांनी पुढच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आयत्या पिठावर रेघोट्या आणि आयत्या बिळावर नागोबा... पैसे केंद्राचे, मेहनत देवेंद्र फडणवीस यांची आणि चमकोगिरी मेट्रोला कोलदांडा घालणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची. त्यासाठी पोलीस बळाचा वापर करून तोडली गेली मराठी माणसांची घरं.
अतूल भातखळकर ट्विट
दरम्यान, भातखळकर यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, कुरारची कारवाई, ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी... हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. तरीही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली. आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)