Kulgam Encounter: कुलगाम चकमकीत दोन दहशतवादी ठार, लष्कराचे 4 जवान आणि एक पोलिस अधिकारी जखमी; शोध मोहीम सुरूच

त्यानंतर कुलगामच्या आदिगाम भागात शोध मोहीम राबवण्यात आली. लष्कर आणि दहशत वाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

Photo Credit- X

Kulgam Encounter: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये लष्कराचे चार जवान आणि एक पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. सर्व जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी सध्या संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम राबवली जात आहे. सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. (हेही वाचा:Dantewada Encounter: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 9 नक्षलवादी ठार )

शोध मोहिमेदरम्यान गोळीबार झाला

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भागात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर कुलगामच्या आदिगाम भागात शोध मोहीम राबवण्यात आली. सुरक्षा दल दहशतवाद्यांची घरोघरी झडती घेत होते. त्यानंतर अचानक दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यात लष्कराचे 4 जवान आणि एक पोलिस अधिकारी जखमी झाले. जखमी पोलिसांची प्रकृती आता स्थिर असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

या महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये अनेक चकमकी झाल्या

यापूर्वी 15 सप्टेंबर 2024 रोजी पुंछ जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला होता. 14 सप्टेंबर रोजी बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. किश्तवाडमध्ये झालेल्या चकमकीत कर्तव्य बजावताना लष्कराचे दोन जवान शहीद झाल्यानंतर ही चकमक झाली.

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका सुरू असताना हा हल्ला घडला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दोन टप्प्यातील निवडणुका संपल्या आहेत. विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 18 सप्टेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबर रोजी गंदरबल, बडगाम, श्रीनगर आणि जम्मू विभागातील सहा जिल्हे, राजौरी, रियासी आणि पूंछ येथे झाले. तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होणार आहे, तर मतमोजणी 8 ऑक्टोबरला होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी सुरक्षा दलांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif