Konkan Railway Monsoon Time Table 2024: कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक! 10 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान मान्सून स्पेशल वेळापत्रकानुसार धावणार ट्रेन

पावसाळा सुरू झाल्यानंतर कोकण रेल्वेमार्गावर मान्सून वेळापत्रकानुसार रेल्वे धावणार आहे. त्यामुळे कोकणकरांनी गावी जाण्यासाठी वेळापत्रक पाहून तिकिटे बूक कारवी.

Photo Credit -X

Konkan Railway Monsoon Time Table 2024: कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्याच्या दिवसात विशेष वेळापत्रकानुसार ट्रेन चालवल्या जातात. त्यानुसार यंदाच्या मान्सून मध्ये 10 जून 2024 ते 31 ऑक्टोबर 2024 दरम्यान विशेष ट्रेन कोकण रेल्वे मार्गावर चालवल्या जाणार आहेत. यामध्ये काही ट्रेन नियमित चालवण्याऐवजी आठवड्यातल्या ठरावीक वारी चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी वेळापत्रक पाहून पावसाळ्यात कोकणासाठीचे तिकीटांचे प्लॅनिंग करावे.

कोकण रेल्वेचं मान्सून स्पेशल वेळापत्रक:

मुंबईहून कोकणकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी हे वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. कोकण रेल्वे गेल्या अनेक वर्षांपासून वेळापत्रकाची अंमलबजावणी करत आहे. कोकणातील प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी गाड्यांचा वेग कमी करण्याच्यादृष्टीने ही उपाययोजना महत्त्वाची आहे. कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे रेल्वे मार्गावर ट्रॅकमनची गस्त वाढवण्यात आली आहे. गाड्यांचा वेग कमी करून वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. हा बदल 10 जूनपासून करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement