Heart Attack On Birthday: वाढदिवशीच हृदयविकाराचा झटका, कोल्हापुरातील तरुणाचा मृत्यू

प्रणव प्रकाश पाटील असे या तरुणाचे नाव. तो केवळ 25 वर्षांचा होता. शिंगणापूर येथे राहणाऱ्या या तरुणाला वाढदिवशीच हृदयविकाराचा झटका येऊन त्याला मृत्यूने गाठले.

Heart Attack | (Photo credits: Pixabay)

जीवनात पूर्ण करण्याची असंख्य स्वप्न डोळ्यात साठवून तो उत्साहाने वावरत असतानाच नियतीने घाला घातला. त्याच्या स्वप्नांचा त्याच्यासोबत सर्वांच्याच डोळ्यासमोर अंत झाला. कोल्हापूरातील (Kolhapur ) एका तरुणाचा वाढदिवशीच हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack On His Birthday) मृत्यू झाला. प्रणव प्रकाश पाटील असे या तरुणाचे नाव. तो केवळ 25 वर्षांचा होता. शिंगणापूर येथे राहणाऱ्या या तरुणाला वाढदिवशीच हृदयविकाराचा झटका येऊन त्याला मृत्यूने गाठले. अनपेक्षीत अशा या घटनेनेत केवळप्रणव प्रकाशचे कुटुंबीयच नव्हे तर त्याचा मित्र परिवार आणि नातेवाईकांनाही मोठा धक्का बसला आहे.

लहानपणीच वडीलांचे छत्र हलवलेला प्रणव प्रकाश आपल्या आईसोबत आजोळी राहात होता. त्याने आजोळीच राहून आईसोबत मोठ्या हिमतीने स्वत:ला सावरले. त्याने घर उभं केलं. नुकतच त्याचं लग्नही झालं. आता बहिणीच्या लग्नाची तयारी सुरु होती. डोळ्यात नवी उमेद आणि असंख्य स्वप्नं घेऊन मोठ्या आत्मविश्वासने तो वावरत होता. त्याचा वाढदिवस असल्याने घरातल्यांनी आणि मित्रांनीही जोरदार तयारी केली होती. सर्वांनी मोबाईल आणि सोशल मीडियावर त्याचे स्टेटस ठेऊन त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. कोणी कल्पनाही केली नव्हती. शुभेच्छांचे हेच स्टेटस भावपूर्ण श्रद्धांजलीत रुपांतरीत करावे लागतील. पण असे घडले खरे. ज्यामुळे सर्वांनाच चटका लागला. (हेही वाचा, Cardiac Arrest: लग्नाच्या एक महिना आगोदर नवरदेवाचे निधन, लग्नपत्रिका वाटताना हृदयविकाराचा झटका)

प्रणव हा सुरुवातीपासूनच धडपड्या होता. होतकरु आणि हसतमूख असल्याने त्याचा मित्रपरीवारही मोठा होता. आवश्यक शिक्षण पूर्ण केल्यावर तो एका फायनान्स कंपनीत कामाला लागला. मेहनती असलेल्या प्रणवने अल्पावधीतच चांगला जम बसवला. ज्यामुळे त्याचे कौतुक होऊ लागले आणि त्याला यशही मिळू लागले. एक-दीड वर्षांपूर्वीच त्याने कोल्हापूरातील चुंबखडी परिसरात एक घर घेतले होते. लागलीच तो त्या घरात राहायलाही गेला. गुरुवारी त्याचा लग्नाचा दुसरा आणि त्याचा 25 वा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याने कार्यालयातून सुट्टी घेतली होती.

दरम्यान, गुरुवारी सकाळपासूनच त्याच्या छातीत दुखू लागले होते. त्यामुळे त्याने खासगी रुग्णायात जाऊन उपचार घेतले. पण, त्याचा फारसा फायदा झाला नाही. डॉक्टरांच्या सांगण्यानूसार त्याचा ईसीजीही ठिक होता. तरीही त्याने दुपारी घरीच आराम केला आणि संध्याकाळच्या सुमारास अचानक त्याच्या छातीत कळ आली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

सर्वांसमोबर बोलता बोलताच प्रणव खाली कोसळला. आई, बहीण आणि पत्नीसमोर ही घटना घडली. त्याला कोसळलेले पाहून कुटुंबीय भेदरुन गेले. तरीही त्यांनी त्याच आवस्थेत त्याला कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पण त्याची प्राणज्योत मालवली.