Kolhapur Shocker: कोल्हापुरात कॅफेवर निर्भया पथकाची धाड, आढळले बेड आणि कंडोम, जोडप्यांना घेतले ताब्यात

कोल्हापूरातील राजारामपुरीतील टाकाळा चौकात एका कॅफेवर निर्भया पथकाने कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अनेक कपल्सना ताब्यात घेतलं आहे.

Kolhapur Shocker: कोल्हापुरात कॅफेवर निर्भया पथकाची धाड, आढळले बेड आणि कंडोम, जोडप्यांना घेतले ताब्यात
Crime (PC- File Image)

कोल्हापूर शहरात (Kolhapur City) निर्भया पथकाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या धडक कारवाईत अनेक खळबळजनक अशी परिस्थीती समोर आली आहे.  शहरातील एका कॅफेवर कारवाई केल्यानतंर धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. निर्भय़ा पथक जेव्हा कॅफेत पोहोचले तेव्हा ते देखील आर्श्चयचकित झाले.  निर्भया पथकाने कॅफेवर कारवाई केली असून आता अधिक चौकशी सुरू आहे.  कोल्हापूरातील राजारामपुरीतील टाकाळा चौकात एका कॅफेवर निर्भया पथकाने कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अनेक कपल्सना ताब्यात घेतलं आहे. बाहेरून कॅफे दिसत असला तरी आत बेड आणि कंडोमची पॅकेट आढळल्याने खळबळ उडाली आहे. (हेही वाचा - Navi Mumbai News: तुर्भेत गणपती विसर्जनात दारूच्या नशेत महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल)

दरम्यान कोल्हापूरात असे प्रकार आता अधिकच वाढले असून गेल्या महिन्यात सुद्धा असाच एक प्रकार समोर आला होता. गेल्या महिन्यातसुद्धा निर्भया पथकाने एका कॅफेवर कारवाई केली होती. संभीजनगर या परिसरात छापे टाकले होते. बस थांब्यावर रोड रोमेओंनी शालेय विद्यार्थीनीची छेड काढली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी निर्भया पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान, निर्भया पथकाने जेव्हा कॅफेंबाबात माहिती घेतली तेव्हा कॅफेत धक्कादायक प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली होती.

(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2023 03:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).