Kolhapur News: विष प्राशन केल्यावर फिरवली गळ्यावर सुरी, उद्योगपती संतोष शिंदे यांची बायकामुलांसह आत्महत्या; कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ

राहत्या घरात त्यांनी विषारी औषध प्राशन करुन पत्नी आणि मुलांसोबत आत्महत्या (Industrialist Santosh Shinde of Gadhinglaj Committed Suicide) केल्याची प्राथमिक माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता.

Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

कोल्हापूर (Kolhapur) येथील प्रसिद्ध उद्योगपती संतोष शिंदे यांचा गुढ मृत्यू झाला आहे. राहत्या घरात त्यांनी विषारी औषध प्राशन करुन पत्नी आणि मुलांसोबत आत्महत्या (Industrialist Santosh Shinde of Gadhinglaj Committed Suicide) केल्याची प्राथमिक माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात ते महीनाभर तुरुंगातही जाणून आले होते. मात्र, आपल्यावर खोटे आरोप करुन बदनाम केल्याने शिंदे काही काळापासून तणावात होते. या तणावातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. दुसऱ्या बाजूला पोलिसांना त्यांच्या खोलीत एक सुसाईड नोट मिळाली आहे. या नोटमध्ये दोन व्यक्तींची नावेही असल्याचे समजते. संतोष शिंदे हे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती होते.

संतोष शिंदे यांनी तुरुंगातून परतल्यावर नव्या उमेदीने उद्योग-व्यवसाय उभारुन स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कायम तणावात असत. घटना घडली त्या दिवशी सकाळी शिंदे यांच्या मातोश्रींनी शिंदे यांच्या खोलीचा दरवाजा वाजवला. परंतू, दरवाजा आतून बंद असल्याने उघडला गेला नाही. अनेकदा दार ठोठाऊनही आतून कोणताच प्रतिसाद न आल्याने त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले आणि दरवाजा उघडण्यास सांगितले. शेजाऱ्यांनीही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा उघडला गेला नाही. अखेर उपस्थित नागरिकांनी दरवाजा तोडला असता आतमध्ये शिंदे आणि त्यांची पत्नी, मुलगा असे सर्वच जण मृतावस्थेत आढळले. (हेही वाचा, Firing On Female Journalist: पुण्यात महिला पत्रकारावर गोळीबार केल्याप्रकरणी चार अल्पवयीनांसह दोघांना अटक; शस्त्रे जप्त)

संतोष शिंदे यांनी लहानपणापासूनच अनेक कष्ट उपसले. त्यातून त्यांनी वेगवेगळे व्यवसाय सुरु केले. मग त्यांनी अर्जुन उद्योगाची स्थापना केली. यात त्यांनी व्यायामशाळा, बेकरी उत्पादन आणि तेल उत्पादन यांसारखे एक ना अनेक व्यवसाय उभारले. त्याला यशही आले. ग्राहकांकडूनही त्यांच्या उत्पादनांना मोठी मागणी असे. अल्पावधीतच त्यांनी आपला व्यवसाय मुंबई आणि कर्नाटकमध्ये विस्तारला. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला आणि खलबळ उडाली. या आरोपात त्यांना महिनाभर तुरुंंगाचीही वारी झाली. ते बाहेर आले खरे. पण मनाने खचले होते. त्यातूनतच ते नेहमी तणावात असत अशी चर्चा आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री विष प्राशन केल्यानतंर गळ्यावर सुरी ओढून आत्महत्या केली. दरम्यान , पोलिसांनी घटनेची नंद घेतली असून तपास सुरु आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif