MS धोनी आणि रोहित शर्मा च्या चाहत्यांमध्ये झुंंबड; मारहाण करेपर्यंत मजल, वाचा कोल्हापुर मधील धक्कादायक प्रकार
कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील कुरुंदवाड (Kurundwad) येथे धोनीचे फॅन्स विरुद्ध रोहित शर्माचे चाहते असा वाद होऊन यातुन अक्षरशः काही तरुण हमरीतुमरी वर उतरले होते.
टीम इंंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंंह धोनी (MS Dhoni) याने अलिकडेच आपली निवृत्ती जाहीर केली तर दुसरीकडे टीम इंंडियाचा ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा (Rohit Sharma) याला कालच भारतीय क्रीडाविश्वातील मानाचा असा राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार (Rajeev Gandhi Khelratna) जाहीर झाला आहे. या दोन्ही बातम्या खरतंर अगदी विरुद्ध भावनिक टोकाच्या आहेत आणि याच फरकामुळे कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील कुरुंदवाड (Kurundwad) येथे एक नवा वाद किंंबहुना राडा पाहायला मिळाला होता. अलिकडेच धोनीचे फॅन्स विरुद्ध रोहित शर्माचे चाहते असा वाद होऊन यातुन अक्षरशः काही तरुण हमरीतुमरी वर उतरले होते, पुढे तर वाद इतका वाढला की थेट यातील काहींंनी एकाला उसाच्या शेतात नेउन मारहाण करण्यापर्यंतची मजल गाठली. हा एकुण प्रकार काय होता जाणुन घ्या. (MS Dhoni Retires: ICC च्या तीन मोठ्या ट्रॉफी जिंकणारा एमएस धोनी एकमेव कर्णधार, पाहा त्याच्या करिअरमधील 5 खास क्षण)
महेंद्रसिंग धोनी ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड याठिकाणी त्याच्या चाहत्यांनी होर्डिंग्ज लावले होते. त्यातच आता रोहित शर्माला खेल रत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रोहितच्या चाहत्यांनी देखील कुरुंदवाड शहरात अभिनंदनाचे बोर्ड लावले. मात्र रोहीत साठी लावण्यात आलेल्या या होर्डिंग्ज ला फाडत काही अज्ञातांनी वादाला तोंंड फोडले आणि मग पुढे हा वाद वाढत गेला. रोहित शर्माचा फॅन असलेल्या तरुणाने होर्डिंग फाडल्याच्या रागातुन शिवीगाळ करताच धोनी च्या चाहत्यांंनी त्याला उसाच्या मळ्यात नेऊन चोपल्याचे सुद्धा समजत आहे. Rohit Sharma’s New Look for IPL 2020! इंडियन प्रीमियर लीग 13 साठी मुंबई इंडियन्स कॅप्टन रोहित शर्माने बदलला लुक, पाहा फोटो
दरम्यान, हा एकुण हाणामारीचा प्रकार घडला असला तरीही याबाबत अजून तक्रार हाती आलेली नाही. तरीही हे दोन्ही गटांंनी लावलेले होर्डिंग्ज महापालिकेला सांगून काढुन टाकल्याची माहिती कुरुंदवाडचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरवडे यांनी दिली आहे.