कोल्हापूर: शारदीय नवरात्रोत्सवात महालक्ष्मी मंदिर भाविकांसाठी राहणार बंद
नवरात्रोत्सवात हे मंदिर बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मंदिर समितीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र जरी अनलॉकच्या टप्प्यात आला असला तरीही राज्यावरील कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट टळले नाही. यामुळे अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात काही ठराविक आणि राज्याच्या आर्थिक दृष्टीने महत्वाची सेक्टर सुरु करण्यात आली आहेत. मात्र यात अजून कोणत्याही धार्मिक स्थळांना सुरु करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा शारदीय नवरात्रोत्सवात (Shardiya Navratri) कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिर (Mahalaxmi Temple) भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. नवरात्रोत्सवात हे मंदिर बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मंदिर समितीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात अनेक धार्मिक तीर्थस्थळे आहेत. लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक दर्शनाला येतात. मात्र कोरोना व्हायरसमुळे मंदिर, तीर्थस्थळे गेल्या 6 महिन्यांपासून बंद असल्याने भाविकांची घोर निराशा झाली आहे. साडेतीन शक्तिपीठांपकी एक मानले जाणारे कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिर हे भाविकांसाठी खुले करण्यात यावे अशी मागणी होत होती. मात्र याबाबत राज्य सरकारने अजूनपर्यंत कोणताही निर्णय न घेतल्याने यंदा हे मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे असले मंदिर समितीने सांगितले आहे. महाराष्ट्र: राज्यात Liquor दुकाने सुरु करण्यास परवानगी पण मंदिरे कधी सुरु करणार असा सवाल करत भाजप कडून महाविकास आघाडीच्या निर्णयाचा निषेध
'मंदिरामध्ये भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. मात्र परंपरेनुसार मंदिरा अंतर्गत धार्मिक विधी केले जाणार आहेत,’ असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत सांगितले.
राज्य सरकारने दिलेल्या नवीन नियमावलीनुसार अनलॉक 5 च्या टप्प्यात हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, बार, मॉल्स सुरु करण्यात आली आहेत. मात्र मंदिरे खुली करण्यास अजून परवानगी देण्यात आली नाही यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.