Kolhapur Women Police Constable took Bribe: कोल्हापूरात महिला पोलीसानी घेतली लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ATS) जाळ्यात गुरफटली
दोन हजारांची मागणी केली. आणि ATS च्या जाळ्यात अडकली. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या
Kolhapur Women Police Constable took Bribe: कोल्हापूरातील एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने ( Women Police Constable) दोन हजारांची लाच (Bribe) घेतल्या प्रकरणी रंगेहात सापडली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला सहाय्य कक्षातील महिला कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ATS) जाळ्यात गुरफटली आहे. एका दाम्पत्यांचे कौटुंबिक वादाच्या तक्रार अर्जानंतर समुपदेशन (Counselling) केले त्याच्यातील भांडण मिटल्यानंतर महिला पोलीसांनी त्यांच्या कडून दोन हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदारांने या महिला पोलीसाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आणि हा सगळा खेळ उघडकीस आला.
काजल गणेश लोंढे (28) कोल्हापूर जिल्ह्यायातील करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी या भागातील रहिवासी आहेत.महिला पोलीस लाचघेताना पकडल्या गेल्या आहेत. या प्रकरणांची नोंद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतली आहे. काल गुरुवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षात या संदर्भाती कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने महिन्यापूर्वी पत्नीच्या विरोधातील कौटुंबिक वादाचा अर्ज महिला सहाय्य कक्षात दिला होता. कॉन्स्टेबल काजल लोंढे हिने तक्रारदार पती आणि त्याच्या पत्नीस समोरासमोर बोलवून समुपदेशन केले. यानंतर तंटा मिटून ते दाम्पत्य एकत्रित राहू लागले. त्यानंतर समजपत्र देण्यासाठी लोंढे हीने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीची पडताळणी करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात सापळा रचला. लोंढे हिने महिला सहाय्य कक्षात दोन हजारांची लाच स्वीकारताच पथकाने तिला रंगेहाथ पकडले. या दरम्यान तीच्या घराची देखील झडती घेण्यात आली.